Publicidade

Salmos 13

संगीत दिग्दर्शकासाठी; दावीदाचे स्तोत्र.

1 याहवेह, आणखी किती काळ? सर्वकाळ तुम्ही मला विसरणार का?

किती काळ तुम्ही मजपासून तुमचे मुख लपविणार?

2 मी किती काळ माझ्या विचारांशी द्वंद करावे?

कुठवर दुःखाने रात्रंदिवस माझे हृदय व्यापून टाकावे?

कुठवर माझ्या शत्रूंनी मजवर वरचढ व्हावे?

3 याहवेह, माझ्या परमेश्वरा, मजकडे पाहा आणि मला उत्तर द्या.

या अंधारात माझ्या डोळ्यांना प्रकाश द्या, नाहीतर मजवर चिरनिद्रा ओढवेल.

4 माझे शत्रू म्हणतील "मी त्याला पराभूत केले आहे,"

आणि माझ्या पतनाबद्दल ते आनंदित होतील.

5 कारण तुमच्या निरंतर प्रीतीवर मी भरवसा ठेवला आहे;

माझे हृदय तुमच्या तारणात हर्ष करीत आहे.

6 मी याहवेहची स्तुती गाईन,

कारण त्यांनी माझ्यावर उपकार केले आहेत.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-15_21-32-39-