Publicidade

Salmos 142

दावीदाची मासकीलज्यावेळी तो गुहेमध्ये होता. एक अभ्यर्थना

1 मी अगदी काकुळतीला येऊन याहवेहला विनवणी करतो;

मी उच्चस्वरात याहवेहला दयेची विनंती करतो.

2 माझी तक्रार मी त्यांच्यापुढे ओतत आहे,

आणि माझे कष्ट मी त्यांच्यासमोर प्रकट करत आहे.

3 कारण माझा आत्मा निराशेने व्याकूळ झाला आहे,

तुमच्यासमोर माझी नियती नेहमी स्पष्ट असते.

माझ्या शत्रूंनी

माझ्या मार्गात सापळे लावले आहेत.

4 ते पाहा! माझ्या उजवीकडे मला साहाय्य करणारा कोणीही नाही;

माझी कोणालाही पर्वा नाही.

मला काहीच आश्रय नाही;

माझ्या जिवाची कोणासही चिंता नाही.

5 मी याहवेहचा धावा करतो;

मी म्हटले, "तुम्हीच माझे आश्रयस्थान आहात,

जिवंतांच्या भूमीत तुम्हीच माझे विधिलिखित आहात."

6 माझा धावा ऐका,

कारण मी अत्यंत निराशाजनक मनःस्थितीत आहे;

माझा छळ करणार्‍यांपासून तुम्ही मला मुक्त करा,

कारण ते माझ्यापेक्षा अत्यंत बलिष्ठ आहेत.

7 मला बंदिवासातून मुक्त करा,

म्हणजे मला तुमची उपकारस्तुती करता येईल;

मग तुम्ही मला साहाय्य केले,

म्हणून नीतिमान लोक माझ्याबरोबर आनंदोत्सव करतील.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_06-50-08-