Publicidade

Salmos 124

प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना.

1 सर्व इस्राएलने हे कबूल करावे की—

जर याहवेह आमच्या बाजूने नसते,

2 जेव्हा मनुष्यांनी आमच्यावर आक्रमण केले होते,

जर याहवेह आमच्या बाजूने नसते,

3 तर त्यांचा संताप आमच्यावर भडकला असता.

तेव्हा त्या शत्रूंनी आम्हाला जिवंत गिळून टाकले असते;

4 जलप्रलयात आम्ही बुडून गेलो असतो

व जलप्रवाहात आम्ही पार वाहून गेलो असतो,

5 उचंबळलेल्या लाटांनी आम्हाला

गिळंकृत केले असते.

6 याहवेह धन्यवादित असोत;

त्यांनी आम्हाला शत्रूंचे भक्ष्य होऊ दिले नाही.

7 पारध्याच्या पाशातून पक्षी निसटावा,

त्याप्रमाणे आम्ही जिवानिशी निसटलो;

पाश तुटलेला आहे

आणि आम्ही मुक्त झालो आहोत.

8 आमच्या साहाय्याचा उगम,

स्वर्ग व पृथ्वीचे निर्माणकर्ते परमेश्वर, याहवेह यांचे नाव आहे.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-15_21-32-39-