Publicidade

Salmos 150

1 याहवेहचे स्तवन करा.

त्यांच्या मंदिरात त्यांचे स्तवन करा;

त्यांच्या विशाल आकाशात त्यांचे स्तवन करा;

2 त्यांच्या सामर्थ्यवान कृत्याबद्दल त्यांचे स्तवन करा;

त्यांच्या अद्वितीय थोरवीकरिता त्यांचे स्तवन करा;

3 कर्णा वाजवून त्यांचे स्तवन करा;

सतार व वीणा वाजवून त्यांचे स्तवन करा;

4 डफ वाजवून व नृत्य करून त्यांचे स्तवन करा;

तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्यांचे स्तवन करा.

5 खणखणणारे टाळ वाजवून त्यांचे स्तवन करा;

झणझणणार्‍या झांजा वाजवून त्यांचे स्तवन करा.

6 प्रत्येक सजीव प्राणी याहवेहचे स्तवन करो.

याहवेहचे स्तवन करा.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_18-40-07-