Publicidade

Salmos 46

संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या मुलांची रचना. अलामोथ चालीवर आधारित. एक गीत.

1 परमेश्वर आमचे आश्रय व सामर्थ्य आहेत;

संकटात साहाय्य करण्यास ते सदा सिद्ध असतात.

2 पृथ्वी उलथीपालथी झाली

आणि पर्वत सागराच्या हृदयात कोसळले,

3 सागरांच्या जलांनी गर्जना केल्या,

आणि त्यांच्या प्रचंड कोलाहलाने पर्वत कंपित झाले, तरी आम्ही भिणार नाही. सेला

4 आपल्या परमेश्वराच्या परमपवित्र वसतिस्थानातून एक आनंददायी नदी वाहते;

तिचे प्रवाह परमेश्वराच्या नगरास आनंद देतात.

5 परमेश्वर स्वतः त्या नगरीत राहतात; ती नगरी अढळ राहील;

प्रभात होताच परमेश्वर साहाय्य करतील.

6 राष्ट्रे खवळली, राज्ये कोलमडली;

त्यांच्या मोठ्या गर्जनेने पृथ्वी विरघळून जाते.

7 सर्वसमर्थ याहवेह आमच्याबरोबर आहेत;

याकोबाचे परमेश्वर आमचे दुर्ग आहेत. सेला

8 या आणि आमचे याहवेह करीत असलेली अद्भुत कृत्ये पाहा;

त्यांनी पृथ्वीचा नाश कसा केला आहे.

9 दिगंतापर्यंत युद्धे

ते बंद करतात.

ते धनुष्य तोडतात आणि भाल्याचे तुकडे तुकडे करतात;

ते रथांना अग्नीत भस्म करतात.

10 ते म्हणतात, "शांत व्हा आणि मीच परमेश्वर आहे, हे जाणा;

राष्ट्रांमध्ये माझी महिमा होईल.

पृथ्वीवर माझी महिमा होईल."

11 सर्वसमर्थ याहवेह आमच्याबरोबर आहेत;

याकोबाचे परमेश्वर आमचे दुर्ग आहेत. सेला

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-15_21-32-39-