Publicidade

Salmos 12

संगीत दिग्दर्शकासाठी; शमीनीथ वर आधारित दावीदाचे स्तोत्र.

1 याहवेह, साहाय्य करा, भक्तिमान नाहीसे होत आहेत;

विश्वासयोग्य लोक आता मनुष्यांमध्ये राहिलेले नाहीत.

2 प्रत्येकजण त्यांच्या शेजार्‍यांशी लबाड बोलतो,

ते त्यांच्या ओठांनी खुशामत करतात

परंतु त्यांच्या हृदयात कपट असते.

3 खुशामत करणारे सर्व ओठ,

आणि प्रत्येक गर्विष्ठ जीभ याहवेह कापून टाको.

4 ते बढाई मारतात आणि म्हणतात,

"आम्ही आमच्या जिभेने प्रबल होऊ; आमचे ओठ आमचे संरक्षण करतील,

आम्हावर धनी कोण?"

5 याहवेह म्हणतात, "कारण गरिबांना लुटले आहे व गरजवंत कण्हत आहेत.

म्हणून मी आता उठेन आणि

त्यांची निंदा करणाऱ्यापासून त्यांना संरक्षण देईन."

6 शुद्ध केलेल्या चांदीप्रमाणे,

सात वेळेस शुद्ध केलेल्या सोन्याप्रमाणे,

याहवेहची वचने शुद्ध आहेत.

7,8 जेव्हा मनुष्याच्या दुष्टपणाचा आदर केला जातो,

आणि दुष्ट सर्वत्र अहंकाराने फिरत असतात.

याहवेह, तेव्हा तुम्हीच गरजवंताचे रक्षण करणार

आणि तुम्हीच त्यांना या दुष्टापासून सुरक्षित ठेवाल.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_18-40-07-