Publicidade

Salmos 82

आसाफाचे एक स्तोत्र.

1 परमेश्वराने महासभेत आपले स्थान ग्रहण केले आहे;

त्यांनी "दैवतांसमोर" आपला न्याय जाहीर केला आहे:

2 तुम्ही कुठवर दुष्टांचे समर्थन करणार,

अन्यायी लोकांसाठी पक्षपात करत राहणार? सेला

3 दुबळे आणि पितृहीनांचे समर्थन करा,

गरीब आणि पीडलेल्यांना यथायोग्य न्याय द्या.

4 दुर्बल आणि गरजवंत लोकांना वाचवा;

दुष्टांच्या तावडीतून त्यांना सोडवा.

5 इतर "दैवतां" ना काहीही कळत नाही, काहीही समजत नाही.

ते अंधकारात चालतात;

पृथ्वीचे सर्व पाये डळमळीत झाले आहेत.

6 "मी म्हटले, ‘तुम्ही "दैवते" आहात;

तुम्ही सर्वोच्च परमेश्वराचे पुत्र आहात.’

7 परंतु तुम्ही मर्त्य मानवांप्रमाणेच मराल;

आणि इतर शासकाप्रमाणे तुमचे पतन होईल."

8 हे परमेश्वरा, उठा आणि जगाचा न्याय करा,

कारण समस्त राष्ट्र तुमचे वतन आहे.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_06-50-08-