Publicidade

Salmos 138

दावीदाचे स्तोत्र.

1 हे याहवेह, मी माझ्या अंतःकरणापासून तुमचे उपकारस्मरण करेन;

मी तुमची स्तुतिस्तोत्रे "दैवतांच्या" पुढे गाईन.

2 उपासना करीत असताना, तुमच्या मंदिराकडे मी नतमस्तक होईन,

आणि तुमच्या सर्व दयामय प्रीतीबद्दल आणि विश्वासूपणाबद्दल,

तुमची उपकारस्तुती करेन,

कारण तुम्ही तुमच्या वचनाला

तुमच्या किर्तीपेक्षा उंच केले आहे.

3 जेव्हा मी हाक मारली, तुम्ही प्रत्युत्तर दिले;

मला शक्ती देऊन खूप धैर्य दिले.

4 हे याहवेह, पृथ्वीवरील सर्व राजे तुमचे उपकारस्मरण करतील,

कारण यातील प्रत्येकजण तुमच्या मुखाचे निर्णय ऐकतील.

5 ते याहवेहच्या गौरवशाली मार्गाचे गुणगान करतील,

कारण याहवेहचे गौरव अतिथोर आहे.

6 याहवेह महान असले तरी ते दीनांची दयेने काळजी घेतात;

गर्विष्ठ लोकांना मात्र ते दुरूनच ओळखतात.

7 मी संकटांनी वेढलेला असलो,

तरी तुम्ही मला त्यातून सुखरुपपणे सोडविता;

माझ्या संतापलेल्या शत्रूंवर तुम्ही आपला हात उगारता;

तुमचा उजवा हात माझा बचाव करतो.

8 याहवेह माझे निर्दोषत्व सिद्ध करतील;

परमेश्वरा, तुमची करुणा सनातन आहे—

आपल्या हस्तकृतीचा त्याग करू नका.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_06-50-08-