Publicidade

Salmos 8

संगीत दिग्दर्शकासाठी. गित्तीथ वर आधारित दावीदाचे स्तोत्र.

1 याहवेह, आमच्या प्रभो,

संपूर्ण पृथ्वीवर तुमचे नाव किती वैभवी आहे!

स्वर्गदेखील तुमचे

गौरव प्रकट करते.

2 लेकरे आणि तान्ह्या बालकांच्या स्तुतीद्वारे

तुमचे शत्रू व विरोध्यांना शांत करण्यासाठी

शत्रूविरुद्ध बळ स्थापित केले आहे.

3 जेव्हा तुमच्या बोटांची रचना असलेल्या

आकाशाकडे बघून मी विचार करतो,

चंद्र आणि तारे यथास्थानी

स्थापित केलेले पाहतो,

4 मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण ठेवावी?

मानवप्राणी तो काय की तुम्ही त्याची काळजी करावी?

5 तुम्ही त्यांना देवदूतांपेक्षा किंचित कमी असे घडविले आहे.

गौरव आणि सन्मान यांचा मुकुट तुम्ही त्यांच्या डोक्यावर ठेवला आहे.

6 तुमच्या प्रत्येक हस्तकृतीवर तुम्ही त्यांना सत्ता दिली आहे;

सर्वगोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवल्या.

7 सर्व कळप व गुरे,

आणि वनपशू.

8 आकाशातील पक्षी,

आणि समुद्रातील मासे,

सागरात संचार करणारे सर्व प्राणी.

9 याहवेह, आमच्या प्रभो,

संपूर्ण पृथ्वीवर तुमचे नाव किती वैभवी आहे!

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-15_21-32-39-