Publicidade

Salmos 101

दावीदाची रचना. एक स्तोत्र.

1 हे याहवेह, तुमची प्रीती आणि न्याय याविषयी मी गीत गाईन;

मी तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.

2 सुज्ञपणाने जीवन जगणे हे माझे लक्ष्य आहे—

तुम्ही माझ्याकडे कधी येणार?

माझ्या घरातील माझा व्यवहार

मी निष्कलंक तर्‍हेने करेन.

3 मी कुठल्याच अनुचित वस्तूकडे

नजर टाकणार नाही.

मला विश्वासहीन लोकांच्या व्यवहारांचा तिरस्कार आहे.

त्यांच्यापासून मी अलिप्त राहीन.

4 कुटिल हृदय माझ्यापासून दूर राहील;

अनीतीच्या कुठल्याच गोष्टीशी मी संबंध ठेवणार नाही.

5 आपल्या शेजार्‍यांची गुप्तपणे निंदानालस्ती करणार्‍यास,

मी नष्ट करेन;

दुसर्‍यांकडे तुच्छतेने पाहणार्‍याचा व अहंकारी हृदयाच्या मनुष्याचा

सहवास मला असह्य वाटेल.

6 देशातील निष्ठावान लोकांवर मी माझी दृष्टी लावेन,

जेणेकरून ते माझ्या सहवासात राहतील;

ज्यांचे आचरण दोषरहित असेल,

असेच लोक माझी सेवा करतील.

7 परंतु जे इतरांची फसवणूक करतात,

अशांना मी माझ्या घरात राहू देणार नाही,

आणि जे असत्य बोलतात,

ते माझ्यापुढे उपस्थित राहणार नाहीत.

8 दररोज सकाळी

मी आपल्या राज्यातील दुर्जनांना नष्ट करेन;

याहवेह देवाच्या या नगरीतील

प्रत्येक दुष्टाचा मी नायनाट करेन.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_06-50-08-