Publicidade

Salmos 131

प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना.

1 हे याहवेह, माझे हृदय गर्विष्ठ नाही,

माझी नजर उन्मत्त नाही;

मला समजत नाही अशा महान

आणि अद्भुत गोष्टींपासून मी स्वतःला दूर ठेवतो.

2 दूध तुटलेले मूल

जसे आपल्या आईजवळ शांत व गप्प असते;

दूध तुटलेल्या मुलासारखा मी आता तृप्त होय.

3 हे इस्राएला, तू देखील शांतपणे,

आता आणि सर्वदा, याहवेहवर आशा ठेव.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-15_21-32-39-