Publicidade

Salmos 29

दावीदाचे स्तोत्र.

1 अहो दिव्यदूतांनो,

याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या.

2 याहवेहच्या नावाला योग्य ते गौरव द्या;

पवित्रतेच्या वैभवाने याहवेहची उपासना करा.

3 याहवेहची वाणी जलांवर आहे;

गौरवशाली याहवेहची वाणी

महा जलाशयांवर गर्जत आहे.

4 याहवेहची वाणी प्रतापशाली आहे;

प्रभावी आहे याहवेहचा स्वर.

5 याहवेहच्या गर्जनेने देवदारू वृक्ष मोडून पडतात;

लबानोनमधील देवदारू वृक्ष दुभंगतात.

6 लबानोनचा डोंगर वासराप्रमाणे

आणि सिर्योन तरुण रानबैलाप्रमाणे बागडतो;

7 याहवेहचा आवाज कडाडतो,

विजा चमकल्यासारखा.

8 याहवेहच्या आवाजाचा गडगडाट वाळवंटे ढवळून काढतात;

कादेशचे अरण्य याहवेह कंपित करतात.

9 याहवेहच्या आवाजाने हरिणी प्रसवतात

आणि वने पर्णहीन होतात.

आणि त्यांच्या मंदिरात सर्वजण म्हणतात: "याहवेहचा, महिमा असो."

10 याहवेह जलप्रलयावर सिंहासनावर आरूढ झालेले आहेत;

याहवेहच महाराज बनून सिंहासनावर सर्वकाळ स्थानबद्ध झालेले आहेत.

11 याहवेह आपल्या लोकांना सामर्थ्य देतात;

याहवेह आपल्या लोकांना शांती देऊन आशीर्वादित करतात.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_06-50-08-