Publicidade

Salmos 128

प्रवाशांचे आराधना गीत.

1 जे याहवेहचे भय बाळगतात,

आणि त्यांच्या आज्ञा पाळतात, ते धन्य!

2 तू आपल्या हातांनी केलेल्या श्रमाचे फळ खाशील;

तू सुखी होशील व तुझे कल्याण होईल.

3 तुझी पत्नी तुझ्या घरात

सफल द्राक्षवेलीसारखी होईल;

तुझी मुले तुझ्या मेजाभोवती

जैतुनाच्या रोपांसारखी होतील.

4 होय, याहवेहचे भय बाळगून त्यांच्यावर विश्वास ठेवणार्‍यांना

हाच आशीर्वाद असणार.

5 याहवेह सीयोनातून तुला आशीर्वादित करो;

तुझे आयुष्यभर

तू यरुशलेमची समृद्धी बघशील.

6 नातवंडाचे सुख लाभेल इतके दीर्घ आयुष्य तुला मिळो—

इस्राएलास शांती लाभो.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_06-50-08-