Publicidade

Salmos 47

संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र.

1 अहो सर्व लोकांनो, टाळ्या वाजवा;

उत्साहपूर्ण शब्दांनी परमेश्वराचा जयजयकार करा.

2 कारण सर्वोच्च याहवेह भयप्रद आहेत;

ते अखिल पृथ्वीचे सार्वभौम राजा आहेत.

3 त्यांनीच लोकांना आमच्या सत्तेखाली

आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणले.

4 ते आमच्यासाठी आमचे वतन निवडतात,

हेच याकोबाचे वैभव आहे, ज्यांच्यावर त्यांनी प्रीती केली. सेला

5 प्रचंड जयघोष होत असताना, परमेश्वर वर गेले आहेत,

तुतार्‍यांचे मोठे निनाद होत असताना, याहवेह वर गेले आहेत.

6 परमेश्वराची स्तुती गा, स्तुती गा;

आमच्या राजाची स्तुती गा, स्तुती गा.

7 कारण परमेश्वर अखिल पृथ्वीचे राजाधिराज आहेत;

त्यांच्याप्रीत्यर्थ स्तुतिस्तोत्रे गा.

8 परमेश्वर सर्व राष्ट्रांवर सत्ता गाजवितात;

परमेश्वर आपल्या पवित्र सिंहासनावर विराजमान आहेत.

9 जगातील लोकांचे अधिपती,

अब्राहामाच्या परमेश्वराचे लोक म्हणून एकत्र जमले आहेत;

पृथ्वीवरील राजे वास्तविक परमेश्वराचेच आहेत,

ते अत्यंत थोर आहेत.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-15_21-32-39-