Arrependimento
O arrependimento é a porta da graça. A Bíblia declara que Deus não deseja a morte do ímpio, mas que se converta e viva. Arrependei-vos, pois o Reino dos Céus está próximo.
Chamado ao arrependimento
Arrependei-vos, porque o Reino dos Céus está próximo. Quem se arrepende e confessa encontra restauração e perdão.
तेव्हापासून येशूंनी उपदेश करण्यास सुरुवात केली, "पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे."
जा, पश्चात्तापाला साजेल अशी फळे द्या.
ते पुढे म्हणाले जा आणि याचा अर्थ काय आहे शिकून घ्या: ‘मला तुमची अर्पणे नकोत.’ पण दया हवी आहे. मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनांस बोलविण्यास आलो आहे."
ते म्हणाले, "वेळ आली आहे," व "परमेश्वराचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि शुभवार्तेवर विश्वास ठेवा!"
मी तुम्हाला सांगतो, तसे मुळीच नाही. जर तुम्हीही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा नाश होईल.
मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनास पश्चात्तापासाठी बोलविण्यास आलो आहे."
पेत्राने उत्तर दिले, "पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांच्या क्षमेसाठी येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.
यास्तव पश्चात्ताप करा आणि परमेश्वराकडे वळा, म्हणजे तुमची पापे पुसून टाकली जावी व दिवसेंदिवस प्रभूकडून तुम्हाला नवीन शक्ती प्राप्त व्हावी,
पूर्वी परमेश्वराने अशा अज्ञानाकडे दुर्लक्ष केले, परंतु आता सर्व ठिकाणच्या लोकांनी पश्चात्ताप करावा अशी आज्ञा ते करीत आहे.
A graça do arrependimento
Os que eu amo, eu repreendo e disciplino. Arrepende-te! Deus não quer que nenhum se perca — mas que todos cheguem ao arrependimento.
ज्यांच्यावर मी प्रीती करतो, त्यांना मी दटावतो व शिक्षा देऊन शिस्त लावतो. म्हणून आस्थावान होऊन पश्चात्ताप करावा.
कित्येक लोक ज्याला संथपणा म्हणतात, तसे प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाहीत, तर ते तुमच्याबरोबर सहनशीलतेने वागतात. कोणाचाही नाश व्हावा, अशी त्यांची इच्छा नाही, तर प्रत्येकाने पश्चात्ताप करावा अशी त्यांची इच्छा आहे.
कारण कोणाच्याही मरणाने मला आनंद होत नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. पश्चात्ताप करा आणि जिवंत राहा!
जर माझे लोक, ज्यांना माझ्या नावाने ओळखले जाते, ते जर स्वतःला नम्र करतील आणि प्रार्थना करतील, माझा शोध घेतील आणि त्यांच्या वाईट मार्गांपासून फिरतील, तेव्हा मी स्वर्गातून ऐकेन आणि त्यांच्या पापांची क्षमा करेन आणि त्यांच्या भूमीला आरोग्य देईन.
हिज्कीयाहने सर्व इस्राएल आणि यहूदीया या ठिकाणी संदेश पाठविला आणि एफ्राईम व मनश्शेह यांनाही पत्र लिहून आमंत्रण दिले की, त्यांनी यरुशलेममधील याहवेहच्या मंदिरात यावे आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेहसाठी वल्हांडण सण साजरा करावा. राजा आणि त्याचे अधिकारी आणि यरुशलेममधील सर्व मंडळी यांनी असे ठरविले की, दुसऱ्या महिन्यात वल्हांडण सण साजरा करावा. नेहमीच्या वेळेप्रमाणे त्यांना तो सण साजरा करता आला नव्हता, कारण स्वतःचे शुद्धीकरण केलेले असे पुरेसे याजक तिथे नव्हते आणि लोक यरुशलेममध्ये एकत्र जमले नव्हते. ही योजना योग्य आहे असे राजाला आणि संपूर्ण मंडळीला वाटले. त्यांनी ठरविले की, बेअर-शेबापासून दानपर्यंत संपूर्ण इस्राएलमध्ये एक घोषणापत्र पाठवावे आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांचा वल्हांडण सण साजरा करण्यासाठी लोकांना यरुशलेमकडे बोलावून घ्यावे. जसे लिहिले गेले होते त्याप्रमाणे तो मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आलेला नव्हता.
राजाज्ञेनुसार, राजा आणि त्याच्या अधिकार्यांकडून पत्रे घेऊन संदेशवाहक संपूर्ण इस्राएल आणि यहूदीयामध्ये गेले, ज्यात लिहिले होते:
"अहो, इस्राएलचे लोकहो, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेहकडे परत या, म्हणजे, अश्शूरी राजांच्या हातातून जे निसटले आहेत त्यांच्याकडे ते परत येतील. तुमच्या पालकांसारखे होऊ नका आणि तुमच्याबरोबर असलेल्या इस्राएली लोकांसारखे होऊ नका, जे त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहबरोबर अविश्वासू राहिले, त्यामुळे त्यांनी त्यांना उपहासाचे पात्र केले, जसे ते तुम्हाला दिसतात. तुम्ही तुमच्या पूर्वजांसारखे ताठ मानेचे होऊ नका. याहवेहना शरण जा. त्यांनी सनातनकाळासाठी पवित्र केलेल्या त्यांच्या पवित्रस्थानात या. तुमचे परमेश्वर याहवेहची सेवा करा, म्हणजे त्यांचा भयंकर क्रोध तुमच्यापासून दूर होईल. जर तुम्ही याहवेहकडे परत याल, तर तुमच्याबरोबर असणारे इस्राएली लोक आणि तुमच्या मुलाबाळांवर त्यांना कैद करणाऱ्यांकडून दया करण्यात येईल आणि ते या देशात परत येतील, कारण तुमचे परमेश्वर याहवेह हे कृपाळू आणि दयाळू आहेत. जर तुम्ही त्यांच्याकडे परत आलात तर ते तुमच्यापासून मुख फिरविणार नाहीत."
संदेशवाहक एफ्राईम आणि मनश्शेह येथील गावोगाव तसेच जबुलूनपर्यंत गेले, परंतु लोकांनी त्यांचा तिरस्कार केला आणि त्यांची थट्टा केली. तरीसुद्धा आशेर, मनश्शेह आणि जबुलून येथील काही लोकांनी स्वतःला नम्र केले आणि ते यरुशलेमला गेले. याहवेहच्या वचनास अनुसरून राजा आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी जे आदेश दिले होते, ते एकमताने पूर्ण करण्यासाठी यहूदीयामध्येही परमेश्वराचा हात लोकांवर होता.
दुसऱ्या महिन्यामध्ये बेखमीर भाकरीचा सण साजरा करण्यासाठी यरुशलेममध्ये बरेच लोक एकत्र आले. त्यांनी यरुशलेममधील वेद्या काढून टाकल्या आणि धूपाच्या वेद्यांची जागा मोकळी केली आणि त्या किद्रोन खोऱ्यात फेकून दिल्या.
वल्हांडणाचा कोकरा त्यांनी दुसऱ्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी कापला. याजकांना आणि लेवीय लोकांना स्वतःची लाज वाटली आणि त्यांनी स्वतःला पवित्र केले आणि याहवेहच्या मंदिरात होमार्पणे आणली. नंतर त्यांनी परमेश्वराचा मनुष्य मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांची नियमित पदे स्वीकारली. लेव्यांनी त्यांच्या हाती दिलेले रक्त याजकांनी वेदीवर शिंपडले. जमलेल्या समुदायामधील पुष्कळ लोकांनी स्वतःला पवित्र केलेले नसल्यामुळे जे विधिपूर्वक शुद्ध झालेले नव्हते आणि त्यांना व त्यांच्या कोकऱ्यांना याहवेहसमक्ष पवित्र करू शकले नव्हते, त्यामुळे लेवीय लोकांनी त्या सर्वांकरिता वल्हांडणाच्या कोकरांचा वध केला. एफ्राईम, मनश्शेह, इस्साखार आणि जबुलून येथून आलेल्या पुष्कळ लोकांपैकी बहुतेक लोकांनी स्वतःला शुद्ध केलेले नव्हते, तरीही जे लिहिलेले होते त्याविरुद्ध जाऊन त्यांनी वल्हांडण सणाचे अन्न खाल्ले. परंतु हिज्कीयाहने त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि म्हणाला, "याहवेह, जे चांगले आहेत, त्यांनी प्रत्येकांना क्षमा करावी. जरी ते पवित्रस्थानाच्या नियमानुसार शुद्ध नसले तरीसुद्धा, ते त्यांचे अंतःकरण त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांच्याकडे लावतात." आणि याहवेहनी हिज्कीयाहचे ऐकले आणि लोकांना बरे केले.
यरुशलेममध्ये जे इस्राएली लोक उपस्थित होते, त्यांनी बेखमीर भाकरीचा सण सात दिवस मोठ्या आनंदात साजरा केला, तर लेवीय लोकांनी आणि याजकांनी याहवेहना समर्पित केलेल्या प्रतिध्वनीच्या वाद्यांसहित दररोज याहवेहची स्तुती केली.
ज्यांनी याहवेहच्या सेवेसाठी योग्य समज दाखविला, त्या सर्व लेवीय लोकांना हिज्कीयाहने प्रोत्साहित केले. सात दिवस त्यांना नेमून दिलेला त्यांचा भाग त्यांनी खाल्ला आणि शांत्यर्पणाचे अर्पण केले आणि त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वराची स्तुती केली.
तेव्हा संपूर्ण सभेने पुढे अधिक सात दिवस हा सण साजरा करण्याचे मान्य केले; त्यामुळे आणखी सात दिवस त्यांनी हा उत्सव आनंदाने साजरा केला. यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने या सभेसाठी एक हजार बैल आणि सात हजार मेंढ्या आणि शेळ्या दिल्या आणि अधिकाऱ्यांनी त्यांना एक हजार बैल आणि दहा हजार मेंढ्या व शेळ्या दिल्या. तेव्हा मोठ्या संख्येने याजकांनी स्वतःला पवित्र केले. यहूदीयाच्या संपूर्ण सभेने याजक आणि लेवीय आणि इस्राएलमधून जमलेले सर्व लोक, इस्राएलमधून आलेले परदेशी आणि यहूदीयामधील रहिवाशांनी आनंद साजरा केला. त्यावेळेस तिथे यरुशलेममध्ये मोठा आनंद झाला होता, कारण इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनच्या दिवसांपासून यरुशलेममध्ये यासारखे काहीही घडले नव्हते. याजक आणि लेवीय हे लोकांना आशीर्वाद देण्यासाठी उभे राहिले आणि परमेश्वराने त्यांचे ऐकले, कारण त्यांची प्रार्थना स्वर्गात, परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानापर्यंत पोहोचली.
तुमची वस्त्रे फाडून नव्हे,
तर तुमचे अंतःकरण फाडा.
याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत या,
कारण ते कृपाळू व दयाळू आहेत.
ते मंदक्रोध आणि अधिक प्रीती करणारे आहेत,
आणि ते विपत्तीविषयी अनुताप करतात.
दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी आठव्या महिन्यात इद्दोचा नातू व बेरेख्याहचा पुत्र, संदेष्टा जखर्याहला याहवेहकडून हे वचन प्राप्त झाले:
"याहवेह तुमच्या पूर्वजांवर अत्यंत क्रोधित झाले होते. म्हणून लोकांना सांग: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘तुम्ही माझ्याकडे परत या आणि मी तुम्हाकडे परत येईन,’ सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात. तुमच्या पूर्वजांसारखे तुम्ही होऊ नका, ज्यांना पूर्वीच्या संदेष्ट्यांनी घोषणा केली: ‘आपल्या दुष्ट मार्गापासून व दुष्ट प्रथांपासून मागे वळा.’ पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याच्याकडे लक्ष दिले नाही, याहवेह जाहीर करतात. तुमचे पूर्वज कुठे आहेत? आणि संदेष्टे, ते कायमचे जगतात का? पण माझी वचने व माझे नियम जे मी माझ्या सेवक संदेष्ट्यांना आज्ञापिले होते, त्यांनी तुमच्या पूर्वजांना मागे टाकले आहे ना?
"तेव्हा त्यांनी पश्चात्ताप केला व ते म्हणाले, ‘आमचे वागणे व प्रथांमुळे याहवेहकडून आम्हाला जी शिक्षा मिळाली, त्यास आम्ही पात्र आहोत. जी करण्याचा त्यांनी निर्धार केला होता.’ "
दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी वर्षाच्या अकराव्या महिन्यातील चोविसाव्या दिवशी, शबात महिन्यात, संदेष्टा जखर्याह, बेरेख्याहचा पुत्र व इद्दोचा नातू याला याहवेहचे वचन प्राप्त झाले.
रात्रीच्या वेळी मला एक दृष्टान्त मिळाला, एका तांबड्या घोड्यावर एक मनुष्य बसलेला मी पाहिला. तो एका खोऱ्यात मेंदीच्या झुडपांमध्ये उभा होता. त्याच्या पाठीमागे तांबडे, तपकिरी व पांढरे असे दुसरे घोडे होते.
मी विचारले, "माझ्या प्रभू, हे सर्व काय आहे?"
एक स्वर्गदूत जो माझ्याशी बोलत होता, त्याने उत्तर दिले, "ते काय आहे हे मी तुला दाखवेन."
मग मेंदीच्या झुडपांमध्ये उभे असलेल्या मनुष्याने सांगितले, "याहवेहने यांना संपूर्ण पृथ्वीवरून फेरी मारण्याकरिता पाठविले आहे."
मग त्यांनी मेंदीच्या झुडपांमध्ये उभ्या असलेल्या याहवेहच्या दूताला वृतांत सांगितला, "आम्ही सर्व पृथ्वीवरून फिरून आलो आहोत आणि संपूर्ण जगात विश्रांती व शांतता नांदत आहे."
मग याहवेहच्या दूताने म्हटले: "हे सर्वसमर्थ याहवेह, गेली सत्तर वर्षे तुम्ही यरुशलेम व यहूदीयाच्या नगरांवर संतापलेले आहात, त्यांच्यावर दया करण्याचे तुम्ही किती वेळ नाकारणार आहात?" तेव्हा माझ्याशी संवाद करीत असलेल्या दूताला याहवेहने सांत्वनपर व आश्वासनदायक उत्तर दिले.
मग माझ्याशी संवाद करीत असलेला याहवेहचा स्वर्गदूत म्हणाला, "या वचनाची घोषणा कर: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘मी यरुशलेम व सीयोनाबाबत अत्यंत ईर्ष्यावान आहे, ज्या अन्य राष्ट्रांना सुरक्षित वाटते त्यांच्यावर मी फार क्रोधित झालो आहे, कारण आधी मी माझ्या लोकांवर थोडा नाराज होतो, पण त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार मिळालेली राष्ट्रे मर्यादेपलिकडे गेली.’
"म्हणून याहवेह असे म्हणतात: ‘मी करुणायुक्त होऊन यरुशलेमकडे परत येईन आणि तिथे माझे भवन पुन्हा बांधले जाईल आणि मापनपट्टी यरुशलेमवर ताणली जाईल,’ असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.
"आणखी पुढे घोषणा करा: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘माझी नगरे पुन्हा समृद्धीने ओसंडून वाहू लागतील आणि याहवेह पुन्हा सीयोनाचे सांत्वन करतील आणि यरुशलेमची निवड करतील.’ "
नंतर मी वर पाहिले तर मला चार शिंगे दिसली. मी माझ्याशी संवाद करीत असलेल्या दूताला विचारले, "हे काय आहे?"
त्याने उत्तर दिले, "ही शिंगे आहेत, ज्यांनी यहूदीया, इस्राएल आणि यरुशलेम येथील लोकांची पांगापांग केली."
नंतर याहवेहने मला चार शिल्पकार दाखविले. तेव्हा मी विचारले, "हे काय करण्यासाठी आले आहेत?"
तेव्हा याहवेहच्या दूताने उत्तर दिले, "ही ती चार शिंगे आहेत ज्यांनी यहूदीयाची इतकी पांगापांग केली, की कोणीही आपले मस्तक वर उचलू शकले नाही, पण हे शिल्पकार त्या चार शिंगांना पकडून भयभीत करून व यहूदीयाविरुद्ध आपली शिंगे उंच करून तिच्या लोकांची पांगापांग करणाऱ्या राष्ट्रांना फेकून देण्यासाठी आले आहेत."
जो कोणी त्याचे पाप झाकून ठेवतो, तो समृद्ध होत नाही,
परंतु जो अपराध कबूल करून ते करण्याचे सोडून देतो त्याला कृपा प्राप्त होते.
मी केलेली कान उघाडणी लक्षात घेऊन आणि पश्चात्ताप करा!
तेव्हा मी माझे विचार तुम्हाला कळवेन,
तुम्हाला माझ्या शिक्षणाची माहिती करून देईन.
Confissão e restauração
Se confessarmos, Ele é fiel e justo. Há alegria no céu por um pecador que se arrepende — o arrependimento abre o caminho da vida.
जर आपण आपली पापे त्यांच्याजवळ कबूल करतो, तर ते विश्वसनीय व न्यायी आहेत, म्हणून आपल्या पापांची क्षमा करतील आणि सर्व अनीतीपासून आपल्याला शुद्ध करतील.
त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की ज्या नव्याण्णव नीतिमान लोकांना पश्चात्तापाची गरज नाही, त्यांच्यापेक्षा पश्चात्ताप करणार्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होतो.
त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, पश्चात्ताप करणार्या एका पाप्याबद्दल परमेश्वराच्या दूतांच्या समक्षतेत आनंद केला जातो."
तुम्ही परमेश्वराजवळ या म्हणजे ते तुम्हाजवळ येतील. अहो पाप्यांनो, आपले हात धुवा आणि दुहेरी मनाचे जे आहेत त्यांनी आपली अंतःकरणे शुद्ध करावीत.