Publicidade

Jó 25

बिल्दद

1 मग बिल्दद शूहीने उत्तर देत म्हटले:

2 "प्रभुत्व आणि भय हे परमेश्वराचे आहे;

तेच परमोच्च स्वर्गामध्ये शांती स्थापित करतात.

3 त्यांच्या सैन्याची गणती करता येईल काय?

आणि त्यांचा प्रकाश कोणावर पडत नाही?

4 मग मर्त्य परमेश्वरासमोर कसा नीतिमान ठरेल?

स्त्रीपासून जन्मलेला व्यक्ती पवित्र असू शकतो काय?

5 जर चंद्र सुद्धा परमेश्वरासमोर प्रकाशमान नाही

आणि तारेही त्यांच्या नजरेत शुद्ध नाहीत,

6 मग मानव तो काय, जो केवळ एक कीटक आहे—

मानवप्राणी, तो तर केवळ अळीप्रमाणे आहे!"

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-18_14-04-22-