Confiar no Senhor
Confiar no Senhor é a base de toda vida espiritual. A confiança em Deus nos livra do medo, nos dá paz e nos posiciona para receber as promessas divinas.
Confiar de todo coração
Confia no Senhor de todo o coração. Não te apoies em teu próprio entendimento — em todos os caminhos o reconheça.
तू आपल्या सर्व अंतःकरणाने परमेश्वरावर विश्वास ठेव.
आणि तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस;
तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव,
आणि तो तुझ्या वाटा सरळ करील.
सर्वसामर्थ्याच्या पंखांखाली आश्रय
जो परात्पराच्या आश्रयात राहतो,
तो सर्वसामर्थ्याच्या सावलीत राहील.
मी परमेश्वराविषयी म्हणेन की, "तो माझा आश्रय आणि माझा किल्ला आहे,
माझा देव, ज्यावर मी विश्वास ठेवतो."
कारण तो तुला पारध्याच्या पाशातून
आणि नाश करणाऱ्या मरीपासून तुला सोडवील.
तो तुला आपल्या पंखानी झाकील,
आणि तुला त्याच्या पंखाखाली आश्रय मिळेल.
त्याचे सत्य ढाल व कवच आहे.
परमेश्वर आपल्या लोकांसभोवती आहे
जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात;
ते सियोन पर्वतासारखे अढळ, सर्वकाळ टिकणारे आहेत.
यरूशलेमेच्या सभोवती पर्वत आहेत तसा परमेश्वर त्याच्या लोकांसभोवती
आता आणि सर्वकाळ आहे.
तो वाईट बातमीला भिणार नाही;
त्याचा परमेश्वरावर भरवसा असून त्यास खात्री आहे.
परमेश्वरावर विश्वास ठेव आणि जे चांगले आहे ते कर;
देशात स्थिर हो आणि विश्वासूपणाने आपला व्यवसाय कर.
परमेश्वरामध्ये आनंद कर,
आणि तो तुला तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे देईल.
तू आपला मार्ग परमेश्वरावर सोपवून दे,
त्याच्यावर विश्वास ठेव आणि तो तुझ्याकडून कृती करील.
तो तुझे न्यायीपण प्रकाशासारखे
आणि तुझा निष्पापपणा मध्यान्हाप्रमाणे दाखवील.
जे तुझ्या नावाला ओळखतात, ते तुझ्यावर विश्वास ठेवतात.
कारण हे परमेश्वरा जे तुला शोधतात त्यांना तू टाकले नाही.
Segurança em Deus
Bem-aventurado o homem que confia no Senhor. Ele é como árvore plantada junto às águas — não temerá quando vier o calor.
परंतु जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तो आशीर्वादीत आहे, कारण परमेश्वर त्याचा विश्वास आहे.
तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या वृक्षाप्रमाणे तो होईल, ज्याची मुळे प्रवाहाजवळ पसरते,
तो हे पाहत नाही की उन्हाची झळ येत आहे, कारण त्याची पाने हिरवीगार राहतात.
मग दुष्काळाच्या वर्षाच्या काळात तो चिंताग्रस्त होणार नाही, किंवा तो फळ देण्याचे थांबवणार नाही."
सर्वकाळ परमेश्वरावर विश्वास ठेव, कारण प्रभू परमेश्वर, याच्या ठायी सर्वकाळचा खडक आहे.
पाहा, देव माझे तारण आहे; मी त्याजवर भाव ठेवीतो व भिणार नाही,
कारण परमेश्वर, होय परमेश्वर माझे बल व गीत आहे. तो माझे तारण झाला आहे."
हे सेनाधीश परमेश्वरा,
जो मनुष्य तुझ्यावर भरवसा ठेवतो तो आशीर्वादित आहे.
काही त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात, तर काही घोड्यांवर,
परंतु आम्ही आमच्या परमेश्वर देवाला हाक मारू.
ते खाली आणले गेले आणि पडले,
परंतु आम्ही उठू आणि ताठ उभे राहू!
मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा
परमेश्वराच्या आश्रयास जाणे अधिक चांगले आहे.
मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा
परमेश्वरास शरण जाणे हे अधिक चांगले आहे.
Não confiar no homem
Não temas — em ti confiarei. Melhor é confiar no Senhor do que confiar no homem ou nos príncipes.
मी देवाच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन.
मी परमेश्वराच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन.
मी देवावर भरंवसा ठेवीन; मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करील?
परंतु मी तुझ्या प्रेमदयेवर विश्वास ठेवला आहे.
माझे हृदय तुझ्या तारणात हर्ष पावते.
परंतु परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे.
तूच माझा देव आहेस, असे मी म्हणतो.
जो पुरुष परमेश्वरास आपला विश्वास करतो,
आणि गर्विष्ठांना किंवा जे खोट्यासाठी त्याच्याकडून फिरले आहेत त्यांना मानत नाही, ते आशीर्वादित आहेत.
पित्याकडे जाण्याचा मार्ग
"तुमचे अंतःकरण घाबरू देऊ नका; देवावर विश्वास ठेवा, माझ्यावरही विश्वास ठेवा.