Dia dos avós
Os avós são tesouros vivos de sabedoria e fé. A Bíblia honra os mais velhos e celebra a transmissão de fé entre gerações — dos avós aos netos e destes aos que virão.
A bênção dos avós
A coroa dos velhos são os filhos dos filhos. A misericórdia de Deus é de geração em geração sobre os que o temem.
वयस्क माणसांची नातवंडे त्यांचे गौरवी भूषण आहेत;
आणि मुलांचे भूषण त्यांचे मातापिता आहेत.
परंतु याहवेहची प्रेममयदया त्यांचे भय धरणार्यांवर
अनादि पासून अनंतकालापर्यंत
तथा त्यांची नीतिमत्ता त्याच्या पुत्र पौत्रांना लाभते.
मी तरुण होतो आणि आता प्रौढ झालो आहे,
तरी आजपर्यंत नीतिमानाला टाकलेला
किंवा त्याच्या संततीला भीक मागताना मी पाहिले नाही.
तुमच्या अद्भुतकृत्यांची महती एक पिढी दुसर्या पिढीस विदित करते;
ते तुमच्या महत्कार्याची उद्घोषणा करतात.
कारण याहवेह चांगले आहेत आणि त्यांची प्रीती सनातन आहे;
त्यांचा विश्वासूपणा पिढ्यान् पिढ्या टिकून राहतो.
Força e fidelidade
Mesmo na velhice darão frutos. Os cabelos brancos são coroa de glória. Deus não abandona seus filhos na idade avançada.
वृद्धापकाळातही ते फळे देतच राहतील,
आणि ते टवटवीत व हिरवेगार राहतील.
ते ही घोषणा करतील, "याहवेह नीतिमान आहेत;
ते माझे खडक आहेत; त्यांच्यामध्ये दुष्टता नाही."
पांढरे केस गौरवी मुकुट आहे;
नीतिमत्तेच्या मार्गात चालल्याने तो लाभतो.
वयस्कर होऊन तुमचे केस पांढरे होईपर्यंत
तो मी आहे, तो मी आहे जो तुम्हाला आधार देईल.
मी तुम्हाला निर्माण केले आहे व मी तुमचा सांभाळ करेन;
मी तुम्हाला आधार देईन व तुम्हाला सोडवेन.
तरुण थकतात व कंटाळतात,
तरुण पुरुष देखील ठेचाळतात व पडतात;
पण जे याहवेहवर आशा ठेवतात
ते नवे सामर्थ्य प्राप्त करतात,
ते त्यांच्या पंखांनी गरुडाप्रमाणे वर झेप घेतील;
ते धावतील पण दमणार नाहीत,
ते चालतील पण क्षीण होणार नाहीत.
तुम्ही स्वतःबद्दल जागरूक असणे आणि स्वतःची काळजी घेणे खूप आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी विसरून जाऊ नये आणि आयुष्यभर त्या तुमच्या स्मरणातून निघून जाऊ नये. तुम्ही ते तुमच्या पुत्रांना आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पुत्रांना शिकवा.