Dificuldades
As dificuldades são parte da vida, mas Deus é refúgio certo em todo tempo de angústia. A Bíblia promete que nenhuma adversidade pode separar os filhos de Deus do seu amor.
Deus é refúgio
Deus é nosso refúgio e fortaleza, socorro bem presente nas angústias. Nada poderá nos separar do amor de Cristo.
परमेश्वर आमचे आश्रय व सामर्थ्य आहेत;
संकटात साहाय्य करण्यास ते सदा सिद्ध असतात.
पृथ्वी उलथीपालथी झाली
आणि पर्वत सागराच्या हृदयात कोसळले,
सागरांच्या जलांनी गर्जना केल्या,
आणि त्यांच्या प्रचंड कोलाहलाने पर्वत कंपित झाले, तरी आम्ही भिणार नाही. सेला
मी याहवेहला म्हणेन, "तेच माझा आश्रय व माझा दुर्ग आहेत,
माझे परमेश्वर, ज्यांच्यावर मी भरवसा ठेवला आहे."
माझ्या लोकांनो, तुम्ही सर्वकाळ त्यांच्यावर भरवसा ठेवा;
आपले हृदय त्यांच्यापुढेच मोकळे करा,
कारण परमेश्वरच आमचे आश्रयस्थान आहेत. सेला
याहवेह, पीडितांसाठी आश्रय आहेत,
संकटकाळी तेच आश्रयाचे दुर्ग आहेत.
ज्यांना तुमचे नाव ठाऊक आहे, ते तुमच्यावर भरवसा ठेवतात,
कारण हे याहवेह, जे तुमचा धावा करतात त्यांना तुम्ही कधीही टाकत नाही.
भयानक उसळणार्या महासागरांवर तुम्हीच नियंत्रण ठेवता;
लाटा उसळताच, तुम्ही त्या शांत करता.
सर्व बलाढ्य लाटांहून कितीतरी अधिक शक्तिशाली,
तुम्ही महासागरापेक्षाही अधिक बलशाली आहात—
सर्वोच्च स्थानातील याहवेह सर्वशक्तिमान आहेत.
त्यांनी वादळ असे शांत केले की ते कुजबुज करू लागले,
आणि समुद्राच्या लाटा अगदी स्तब्ध केल्या.
मग ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करू शकेल? संकट किंवा आपत्ती किंवा छळ किंवा दुष्काळ किंवा नग्नता, धोका किंवा तरवार काय? कारण असे लिहिले आहे:
"तुमच्याकरिता आम्ही दिवसभर मृत्यूचा सामना करीत असतो,
वधाची प्रतीक्षा करणार्या मेंढरांसारखे आम्हाला गणण्यात आले आहे."
नाही, या सर्व गोष्टीत ज्यांनी आमच्यावर प्रीती केली, त्यांच्याद्वारे आम्ही अत्यंत विजयी आहोत. कारण माझी खात्री आहे की ना मरण ना जीवन, ना देवदूत ना भुते, ना वर्तमान ना भविष्यकाळ, ना कोणती शक्ती, अथवा उंची, खोली आणि सृष्टीमधील कोणतीही गोष्ट आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामधील परमेश्वराच्या प्रीतीपासून आपणास विभक्त करू शकणार नाही.
Provisão nas dificuldades
O Senhor provê mesmo nos tempos mais difíceis. Ele sustentou Elias, protegeu Israel e cuida dos seus com fidelidade eterna.
एलीयाहद्वारे दिलेल्या याहवेहच्या वचनानुसार भांड्यातील पीठ संपले नाही आणि तेलाची कुपी कोरडी झाली नाही.
याहवेहनी इस्राएलावर मेघाचे छत्र पसरले,
आणि रात्री प्रकाशासाठी अग्निस्तंभ दिला.
त्यांनी याचना केली, तेव्हा परमेश्वराने लावे पक्षी पाठविले;
त्यांना स्वर्गातील भाकर देऊन तृप्त केले.
त्यांनी खडक फोडला आणि पाणी उफाळून बाहेर आले;
त्याची नदी होऊन ती वैराण प्रदेशातून वाहू लागली.
मी तरुण होतो आणि आता प्रौढ झालो आहे,
तरी आजपर्यंत नीतिमानाला टाकलेला
किंवा त्याच्या संततीला भीक मागताना मी पाहिले नाही.
निर्दोष लोकांच्या दिवसांवर याहवेहचे लक्ष असते,
आणि त्यांचे वतन सर्वकाळ टिकते.
कठीण काळी ते लज्जित होणार नाही;
दुष्काळात त्यांच्याजवळ भरपूर असेल.
कारण मी तहानलेल्या भूमीवर पाण्याचा वर्षाव करेन,
आणि शुष्क जमिनीला झरे देईन;
तुमच्या मुलाबाळांवर मी माझा आत्मा ओतेन
व तुमच्या वंशजांना आशीर्वाद देईन.
तुम्ही गरिबांसाठी आश्रयस्थान असे आहात,
गरजवंतासाठी त्यांच्या संकटातील आश्रयस्थान आहात,
वादळामध्ये निवारा आहात
आणि उष्णतेमध्ये सावली आहात.
कारण निर्दयी लोकांचा श्वास
हा भिंतीवर चालून येणाऱ्या वादळासारखा आहे,
दिवसाच्या उष्णतेपासून ते एक आश्रय व सावली आणि वादळ व पावसापासून ते एक आश्रयस्थान आणि लपण्याचे ठिकाण असेल.
जेव्हा तू खोल जलातून जाशील,
मी तुझ्याबरोबर असेन,
जेव्हा तू नद्या ओलांडून पुढे जाशील,
त्या तुला बुडविणार नाही!
जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील,
तू भाजली जाणार नाही.
त्या ज्वाला तुला भस्म करणार नाहीत.
Força nas provas
Em tudo somos atribulados, mas não esmagados. O Senhor é bom e é fortaleza no dia da angústia — Ele conhce os seus.
आम्ही चहूकडून अतिशय दबून गेलो आहोत, परंतु चिरडले गेलो नाही; घोटाळ्यात पडलो, परंतु हताश होत नाही. छळ झाला पण त्याग करण्यात आला नाही; आम्हाला खाली पाडण्यात आले, परंतु नाश झाला नाही.
याहवेह चांगले आहेत,
संकटसमयी आश्रयस्थान आहेत.
त्यांच्यावर भरवसा ठेवणार्या प्रत्येकाची ते काळजी घेतात.
आपल्या घनदाट मेघांमध्ये ते जल कोंडून ठेवतात,
तरीही त्यांच्या वजनाने आभाळ फाटत नाहीत.
त्यांनी आपले मेघ पसरवून,
पौर्णिमेच्या चंद्राचे मुख झाकले आहे.
त्यांनी जलांवर क्षितिज नेमून ठेवले आहे
प्रकाश व अंधकारासाठीही सीमा आखून दिल्या आहेत.
जिभेच्या तडाख्यापासून तू सुरक्षित राहशील,
विनाश आल्यावर तुला भय बाळगण्याचे नाही.
येशू त्यांना म्हणाले, "अहो, अल्पविश्वासी, तुम्ही इतके का घाबरला?" मग ते उठले आणि त्यांनी वार्याला व लाटांना धमकाविले आणि सर्वकाही शांत झाले.
ते पाहून शिष्य चकित झाले आणि एकमेकास म्हणू लागले: "हे कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहेत? वारा आणि लाटाही त्यांच्या आज्ञा पाळतात!"
जे आज आहे आणि उद्या अग्नीत टाकले जाते, त्या गवताला जर परमेश्वर असा पोशाख घालतात, तर अहो अल्पविश्वासी, ते तुम्हाला अधिक विशेष पोशाख घालणार नाहीत काय? म्हणून ‘आम्ही काय खाणार?’ किंवा ‘आम्ही काय पिणार?’ किंवा ‘आम्ही काय पांघरावे?’ असे म्हणत काळजी करू नका.
ती स्त्री अरण्यात पळून गेली. तिथे तिचे 1,260 दिवस पोषण करण्याकरिता परमेश्वराने तिच्यासाठी एक जागा तयार करून ठेवली होती.
मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवून टाकण्याचे आणि शत्रूवर विजयी होण्याचे सामर्थ्य दिले आहे; तुम्हाला इजा होणार नाही.