Doença
A doença é realidade humana que a Bíblia confronta com compaixão e poder. Jesus curou toda enfermidade e prometeu ouvir a oração da fé pelos enfermos.
Jesus, o curador
Jesus percorreu toda a Galileia curando toda enfermidade e doença entre o povo. Pelo seu nome, curas continuam acontecendo.
येशू सर्व नगरांत व गावात सभागृहांमध्ये शिक्षण देत, राज्याच्या शुभवार्तेची घोषणा करीत आणि प्रत्येक आजार व विकार बरे करीत फिरले.
आजार्यांना बरे करा, मृतांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भूतग्रस्तांतून भुते काढून टाका. तुम्हाला विनामूल्य मिळाले आहे, तुम्हीही विनामूल्य द्या.
आजार्यांना बरे करा, मृतांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भूतग्रस्तांतून भुते काढून टाका. तुम्हाला विनामूल्य मिळाले आहे, तुम्हीही विनामूल्य द्या.
संध्याकाळ झाल्यावर अनेक भूतग्रस्तांना त्यांच्याकडे आणण्यात आले आणि केवळ त्यांच्या शब्दाने त्या दुष्ट आत्म्यांना येशूंनी हाकलून दिले आणि सर्व रोग्यांना बरे केले. यशायाह संदेष्ट्याद्वारे जे म्हटले गेले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले:
"त्याने आमचे विकार स्वतःवर घेतले
आणि आमचे रोग वाहिले."
मला वस्त्रांची गरज होती, तेव्हा तुम्ही मला वस्त्रे दिली; मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली, तुरुंगात होतो तेव्हा तुम्ही माझी भेट घेतली.’
"त्यावेळी नीतिमान लोक त्याला म्हणतील, ‘प्रभूजी, तुम्ही भुकेले असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि अन्न दिले आणि तहानलेले असताना तुम्हाला प्यावयाला दिले? तुम्ही परके असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि घरात घेतले किंवा तुम्ही वस्त्रहीन असताना तुम्हाला वस्त्रे दिली? तुम्ही आजारी असताना किंवा तुरुंगात असताना, आम्ही केव्हा तुमच्या भेटीला आलो?’
"मग राजा उत्तर देऊन म्हणेल, ‘मी तुम्हाला निश्चित सांगतो, जे काही या लहानातील माझ्या एकाही भावा-बहिणीसाठी तुम्ही केले ते तुम्ही माझ्यासाठी केले.’
हे ऐकून येशू त्यांना म्हणाले, "जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते. मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनांस बोलविण्यास आलो आहे."
आजार्यांस बरे करा आणि त्यांना सांगा, ‘परमेश्वराचे राज्य आता तुमच्याजवळ आले आहे.’
जेव्हा येशूंनी त्यांच्या बारा जणांना एकत्र बोलाविले, तेव्हा त्यांना दुरात्म्यांना घालवून देण्याचा आणि प्रत्येक रोग व आजार बरे करण्याचा अधिकार दिला. नंतर त्यांनी आपल्या बारा शिष्यांना परमेश्वराच्या राज्याची घोषणा करण्यास व आजार्यांना बरे करण्यास पाठविले.
Promessas de cura
Eu sou o Senhor que te sara. As Escrituras prometem cura para o corpo e para a alma aos que confiam em Deus.
ते म्हणाले, "जर तुम्ही याहवेह, तुमच्या परमेश्वराचा शब्द काळजीपूर्वक ऐकाल व त्यांच्या नजरेत जे योग्य ते कराल, जर त्यांच्या आज्ञांकडे लक्ष देऊन त्यांचे सर्व नियम पाळाल, तर मी इजिप्तवर ज्या पीडा आणल्या होत्या, त्या तुमच्यावर आणणार नाही, कारण मी याहवेह, तुम्हाला आरोग्य देणारा आहे."
तुमचे परमेश्वर याहवेह यांची सेवा करा, म्हणजे तुमच्या अन्नावर व पाण्यावर त्यांचा आशीर्वाद राहील. तुमच्यातून मी आजार नाहीसे करेन,
तुमचे परमेश्वर याहवेह यांची सेवा करा, म्हणजे तुमच्या अन्नावर व पाण्यावर त्यांचा आशीर्वाद राहील. तुमच्यातून मी आजार नाहीसे करेन,
हे याहवेह, मला आरोग्य द्या, म्हणजे मी बरा होईन;
माझे रक्षण करा, म्हणजे मी सुरक्षित राहीन,
कारण मी केवळ तुमचेच स्तवन करतो.
जे तुझ्या सर्व अपराधांची क्षमा करतात,
जे तुझे सर्व रोग बरे करतात.
भग्नहृदयी लोकांना ते बरे करतात,
आणि त्यांच्या जखमांवर पट्टी बांधतात.
ते आंधळ्यास दृष्टी प्रदान करतात,
याहवेह ओझ्याखाली वाकलेल्यास उचलून उभे करतात,
परमेश्वराला नीतिमान प्रिय आहेत.
जे दुर्बलांची चिंता करतात, ते धन्य;
याहवेह त्यांच्या संकटाच्या वेळी त्यांना मुक्त करतील.
याहवेह त्यांचे रक्षण करून त्यांना सांभाळतील—
ते आपल्या राष्ट्रात आशीर्वादित होतील—
ते त्यांना शत्रूंच्या इच्छेवर सोडणार नाहीत.
ते रोगशय्येवर असता याहवेह त्यांना सांभाळतात;
ते आजारी असता त्यांना आरोग्य देऊन त्यांचे अंथरूण बदलतात.
प्रिय मित्रा, मी प्रार्थना करतो की, तुला चांगले आरोग्य लाभो आणि तुझ्याबरोबर सर्वकाही चांगले होत जावो, जशी तुझ्या आत्म्याचीसुद्धा उन्नती होत आहे.
Oração pelos doentes
A oração da fé salvará o enfermo. Confessai as ofensas uns aos outros e orai uns pelos outros para serdes curados.
तुम्हामध्ये कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तैलाभ्यंग करावा आणि प्रार्थना करावी. विश्वासाने केलेली प्रार्थना त्या रोग्याला बरे करेल; प्रभू त्याला उठवेल. जर त्यांनी पाप केले असेल, तर त्यांची क्षमा होईल.
तुम्हामध्ये कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तैलाभ्यंग करावा आणि प्रार्थना करावी. विश्वासाने केलेली प्रार्थना त्या रोग्याला बरे करेल; प्रभू त्याला उठवेल. जर त्यांनी पाप केले असेल, तर त्यांची क्षमा होईल.
यास्तव एकमेकांजवळ आपली पापे कबूल करा व एकमेकांसाठी प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही निरोगी व्हाल. नीतिमान माणसाची प्रार्थना प्रबळ व परिणामकारक असते.
मला झालेल्या श्रेष्ठ प्रकटीकरणांमुळे मी फुगून जाऊ नये व बढाया मारू नये म्हणून मला शारीरिक काटा देण्यात आला आणि सैतानाचा दूत त्रास देण्याकरिता ठेवण्यात आला. मी प्रभूला तीन वेळा हे माझ्यापासून काढून घ्यावे म्हणून विनंती केली. त्यांनी म्हटले, "माझी कृपा तुला पूर्ण आहे. कारण माझे सामर्थ्य अशक्तपणात पूर्णत्वास येते." कारण माझ्या अशक्तपणाबद्दल मी प्रौढी मिरवीन, म्हणजे ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर राहील. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान व कष्ट, छळ व अडचणी, याविषयी मी अगदी संतुष्ट आहे; कारण जेव्हा मी अशक्त आहे, तेव्हाच मी सबळ असतो.
Esperança na aflição
Ele tomou sobre si as nossas enfermidades. Mesmo na doença, o coração alegre serve de bom remédio e Deus dá esperança.
तरी देखील त्याने आमचे दुःख स्वतःवर घेतले,
आणि आमचे क्लेश वाहिले,
आम्हाला मात्र वाटले की परमेश्वरानेच त्याला ही शिक्षा दिली,
त्यांनीच दुःखी केले व ही पीडा दिली.
तरी देखील त्याने आमचे दुःख स्वतःवर घेतले,
आणि आमचे क्लेश वाहिले,
आम्हाला मात्र वाटले की परमेश्वरानेच त्याला ही शिक्षा दिली,
त्यांनीच दुःखी केले व ही पीडा दिली.
मनुष्यांनी त्याला तुच्छ लेखले आणि त्याला नाकारले,
कारण क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असा तो पुरुष होता.
जणू एखाद्याला पाहून लोकांनी आपली तोंडे लपवावी
तसा तो तिरस्कृत व खालच्या दर्जात गणलेला होता.
आनंदी मन औषधाप्रमाणे हितकर असते,
पण खिन्न मन हाडे शुष्क करते.
मनुष्याचा आत्मा त्याला आजारी अवस्थेतही स्थिर ठेवतो,
पण तुटलेले हृदय कोण सहन करू शकतो?
आशेची प्राप्ती लांबणीवर पडल्याने हृदय खिन्न होते,
परंतु पूर्ण झालेली इच्छा, जीवनाचा वृक्ष ठरते.
मी गप्प राहिलो,
तेव्हा संपूर्ण दिवस माझी हाडे
माझ्या कण्हण्यामुळे जर्जर झाली.
वास्तविक माझ्या शारीरिक आजारात मी तुम्हाला प्रथम शुभवार्तेचा प्रचार केला होता. माझ्या शारीरिक आजाराने जणू तुमची परीक्षा झाली, तरी तुम्ही माझा धिक्कार व अवमान केला नाही. उलट तुम्ही माझे स्वागत केले, जणू काही मी परमेश्वराचा दूत, किंवा स्वतः ख्रिस्त येशूच होतो.
यापुढे पाणीच पीत राहू नकोस, तर कधीकधी तू थोडासा द्राक्षारस घेत जा, कारण पोटाच्या विकाराने तू वारंवार आजारी असतोस.
‘ते त्यांच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू पुसून टाकतील आणि आता मृत्यू,’ दुःख, रडणे व वेदना अस्तित्वात राहणार नाहीत. या सर्व जुन्या गोष्टी कायमच्या नाहीशा झाल्या आहेत."