Gratidão ao Senhor
A gratidão ao Senhor é resposta de amor diante da bondade divina. Louvar a Deus com cântico e magnificá-lo com ação de graças — isso é o que agrada ao Senhor.
Agradecer ao Senhor
Deus transformou nosso lamento em dança. Ele é digno de toda gratidão, em todo tempo e em toda circunstância.
तुम्ही माझ्या शोकाचे रूपांतर हर्षनृत्यात केले.
तुम्ही माझे शोकाचे गोणपाट काढून मला उल्हासाची वस्त्रे घातली,
जेणेकरून मी शांत न राहता, माझ्या हृदयाने सदैव तुमची स्तुतिस्तोत्रे गात राहावे.
याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी सदासर्वकाळ तुमची प्रशंसा करीतच राहीन.
मी परमेश्वराची स्तुती गीत गाऊन करेन
आणि उपकारस्तुती करून त्यांचे गौरव करेन.
उपकारस्तुती करीत त्यांच्या द्वारातून आत जा;
स्तुती करीत त्यांच्या अंगणात प्रवेश करा;
त्यांचे उपकार माना, त्यांच्या नावाला महिमा द्या.
परंतु जे सर्व तुमचा शोध घेतात
ते तुमच्यामध्ये आनंद आणि हर्ष करोत;
जे तुमच्या तारणाच्या साहाय्याची अपेक्षा बाळगतात
ते सर्व नेहमी हेच म्हणोत, "परमेश्वर किती महान आहेत!"
Gratidão constante
Em tudo dai graças. Tudo o que Deus criou é bom, quando recebido com ação de graças e paz no coração.
सर्व परिस्थितीत उपकारस्मरण करा, कारण ख्रिस्त येशूंमध्ये तुमच्यासाठी परमेश्वराची इच्छा हीच आहे.
परमेश्वराने उत्पन्न केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकारस्तुती करून घेतले तर काहीही वर्ज्य नाही. कारण परमेश्वराचे वचन आणि मध्यस्थी प्रार्थना यांनी ती समर्पित होते.
ख्रिस्ताची शांती, तुमच्या अंतःकरणात राज्य करो; कारण एकाच शरीराचे अवयव म्हणून तुम्हीही या शांतीसाठी बोलावलेले आहात. तुम्ही कृतज्ञ राहा.
परंतु मी, उपकारस्तुतीच्या जयघोषाने,
तुमच्यासाठी यज्ञ अर्पण करेन.
मी जो नवस केला होता, तो मी पूर्ण करेन.
मी म्हणेन, ‘तारण याहवेहकडून येते.’ "