A Palavra de Deus
A Palavra de Deus é viva, eficaz e eterna. Desde 'No princípio era o Verbo' até 'O céu e a terra passarão, mas as minhas palavras não hão de passar', ela é a revelação suprema do Criador.
No princípio era o Verbo
A Palavra é Deus encarnado. No princípio era o Verbo, o Verbo estava com Deus, e o Verbo era Deus. Todas as coisas foram feitas por Ele.
प्रारंभी शब्द होता आणि शब्द परमेश्वरा समवेत होता आणि शब्द परमेश्वर होता.
प्रारंभी शब्द होता आणि शब्द परमेश्वरा समवेत होता आणि शब्द परमेश्वर होता.
शब्दाने मानवी शरीर धारण केले व आमच्यामध्ये त्यांनी वास्तव्य केले. आम्ही त्यांचे गौरव पाहिले, ते गौरव एकमेव पुत्राचे, जो पित्यापासून आला व अनुग्रह व सत्याने परिपूर्ण होता त्यांचे होते.
शब्दाने मानवी शरीर धारण केले व आमच्यामध्ये त्यांनी वास्तव्य केले. आम्ही त्यांचे गौरव पाहिले, ते गौरव एकमेव पुत्राचे, जो पित्यापासून आला व अनुग्रह व सत्याने परिपूर्ण होता त्यांचे होते.
नंतर परमेश्वराने म्हटले: "प्रकाश होवो" आणि प्रकाश झाला.
पुत्र परमेश्वराच्या गौरवाचे प्रतिबिंब आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचे हुबेहूब प्रतिरूप आहेत. ते आपल्या वचनाच्या महान शक्तीने सर्व गोष्टींना सुस्थिर ठेवतात. पापांची शुद्धी केल्यानंतर, ते स्वर्गामध्ये वैभवाच्या उजवीकडे बसले आहेत.
विश्वासाद्वारे आपल्याला कळते की सर्व जग परमेश्वराच्या शब्दाने निर्माण झाले; म्हणजे जे दिसते ते दृश्य गोष्टींपासून निर्माण झालेले नाही.
याहवेहच्या शब्दाने स्वर्ग अस्तित्वात आला;
त्यांच्या मुख श्वासाने सर्व नक्षत्रे निर्माण झाली.
A Palavra é viva e eficaz
A Palavra de Deus é mais cortante que espada de dois gumes. Ela julga pensamentos e intenções do coração, transforma e liberta.
कारण परमेश्वराचे वचन जिवंत व सक्रिय आहे. ते कोणत्याही दुधारी तलवारीहून अधिक तीक्ष्ण असून जीव आणि आत्मा, सांधे आणि मज्जा यांना खोलवर भेदून जाणारे व अंतःकरणातील विचार आणि वृत्ती यांचा न्याय करणारे आहे.
कारण परमेश्वराचे वचन जिवंत व सक्रिय आहे. ते कोणत्याही दुधारी तलवारीहून अधिक तीक्ष्ण असून जीव आणि आत्मा, सांधे आणि मज्जा यांना खोलवर भेदून जाणारे व अंतःकरणातील विचार आणि वृत्ती यांचा न्याय करणारे आहे.
याहवेह जाहीर करतात, "माझे वचन अग्नीसारखे ज्वलंत नाही काय? खडक फोडून त्यांचे तुकडे तुकडे करणार्या हातोडीसारखे ते नाही काय?
तारणाचे शिरस्त्राण, आणि आत्म्याची तरवार म्हणजे परमेश्वराचे वचन हे देखील घ्या.
Toda Escritura é inspirada
Toda a Escritura é inspirada por Deus e útil para ensino, correção e instrução na justiça. Ela é perfeita e imutável.
संपूर्ण पवित्रशास्त्र परमेश्वराच्या प्रेरणेने रचलेले आहे आणि शिक्षण, निषेध, सुधारणा, नीतिमत्वाचे शिक्षण याकरिता उपयोगी आहे.
संपूर्ण पवित्रशास्त्र परमेश्वराच्या प्रेरणेने रचलेले आहे आणि शिक्षण, निषेध, सुधारणा, नीतिमत्वाचे शिक्षण याकरिता उपयोगी आहे. यासाठी की, परमेश्वराचा सेवक पूर्णपणे प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.
संपूर्ण पवित्रशास्त्र परमेश्वराच्या प्रेरणेने रचलेले आहे आणि शिक्षण, निषेध, सुधारणा, नीतिमत्वाचे शिक्षण याकरिता उपयोगी आहे. यासाठी की, परमेश्वराचा सेवक पूर्णपणे प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.
Luz para o caminho
A Palavra é lâmpada para os pés e luz para nosso caminho. Ela ilumina, orienta e protege o que nela medita dia e noite.
तुमचे वचन माझ्या पावलांकरिता दिवा
व माझ्या मार्गावरील प्रकाश आहे.
तुमचे वचन माझ्या पावलांकरिता दिवा
व माझ्या मार्गावरील प्रकाश आहे.
तुमचे वचन उलगडल्याने प्रकाश मिळतो;
ते साध्याभोळ्यांना शहाणपण देते.
हे याहवेह, तुमचे वचन अनंतकाळचे आहे;
ते स्वर्गात सर्वकाळ स्थिर राहते.
तरुण मनुष्य शुद्ध मार्गावर कसा चालत राहील?
ते तुमच्या वचनानुसार आचरण करूनच.
मी तुमची वचने माझ्या हृदयात जपून ठेवली आहेत,
जेणेकरून मी तुमच्याविरुद्ध पाप करू नये.
तुमची सर्व वचने पूर्णपणे सत्य आहेत;
तुमचे सर्व नीतियुक्त न्याय अनंतकाळचे आहेत.
ש शीन
Obedecer a Palavra
Seja praticante da Palavra e não apenas ouvinte. Jesus disse que quem ouve e pratica é como o homem sábio que edificou sobre a rocha.
वचन केवळ ऐकून स्वतःची फसवणूक करू नका. वचन सांगते त्याप्रमाणे आचरण करा.
वचन केवळ ऐकून स्वतःची फसवणूक करू नका. वचन सांगते त्याप्रमाणे आचरण करा.
वचन केवळ ऐकून स्वतःची फसवणूक करू नका. वचन सांगते त्याप्रमाणे आचरण करा. कारण जो कोणी वचन ऐकतो, पण त्याप्रमाणे आचरण करत नाही, तो आरशात आपले मुख पाहणार्यासारखा आहे. तो स्वतःकडे पाहिल्यावर निघून जातो आणि आपण कसे दिसत होतो हे ताबडतोब विसरतो.
यास्तव, सर्व अनैतिक घाण व दुष्टतेचा त्याग करा व जे वचन तुम्हामध्ये पेरलेले आहे त्याचा नम्रतेने स्वीकार करा, ते वचन तुम्हाला तारावयास समर्थ आहे.
"यास्तव माझी शिकवण ऐकणारे व त्याप्रमाणे वागणारे सर्वजण एका शहाण्या मनुष्यासारखे आहेत. त्याने आपले घर खडकावर बांधले.
तेव्हा येशूंनी उत्तर दिले, " ‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्या प्रत्येक वचनाने जगेल’ असे लिहिले आहे."
तेव्हा येशूंनी उत्तर दिले, " ‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्या प्रत्येक वचनाने जगेल’ असे लिहिले आहे."
त्याने उत्तर दिले, "परंतु जे परमेश्वराचे वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे आचरण करतात, ते अधिक धन्य आहेत."
पण येशूंनी उत्तर दिले, "असे लिहिले आहे: ‘मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही.’ "
सर्व लोक चकित झाले आणि आपसात म्हणू लागले, "हे काय आहे! काय हा अधिकार आणि त्यांच्या शक्तीने ते अशुद्ध आत्म्यांना आदेश देतात व ते बाहेर येतात!"
A Palavra que permanece
Céus e terra passarão, mas as palavras de Jesus jamais passarão. A Palavra do Senhor permanece para sempre — eterna e infalível.
आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.
आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.
गवत सुकते आणि फुले गळून पडतात,
परंतु आपल्या परमेश्वराचे वचन सर्वकाळ टिकते."
कारण याहवेहची वचने सरळ आहेत;
आपल्या प्रत्येक कार्यात ते विश्वासयोग्य आहेत.
कारण याहवेहची वचने सरळ आहेत;
आपल्या प्रत्येक कार्यात ते विश्वासयोग्य आहेत.
"परमेश्वराचा प्रत्येक शब्द दोषरहित आहे;
जे त्यांच्याकडे आश्रय घेतात, त्यांची ते ढाल आहेत.
कारण याहवेह सुज्ञान देतात;
त्यांच्या मुखातून ज्ञान आणि शहाणपण येते.
कारण याहवेह सुज्ञान देतात;
त्यांच्या मुखातून ज्ञान आणि शहाणपण येते.
O poder da Palavra
A Palavra transforma, sara e liberta. Quem permanece na Palavra de Jesus conhece a verdade, e a verdade o liberta.
ज्या यहूदी पुढार्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, त्यांना येशू म्हणाले, "जर तुम्ही माझी शिकवण घट्ट धरून ठेवाल, तर तुम्ही माझे खरे शिष्य व्हाल.
ज्या यहूदी पुढार्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, त्यांना येशू म्हणाले, "जर तुम्ही माझी शिकवण घट्ट धरून ठेवाल, तर तुम्ही माझे खरे शिष्य व्हाल. मग तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल."
मी तुम्हाला निश्चित सांगतो, जे कोणी माझे वचन पाळतात त्यांना मरणाचा अनुभव कधीही येणार नाही."
"मी तुम्हाला निश्चित सांगतो, जो कोणी माझे वचन ऐकतो आणि ज्यांनी मला पाठविले त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याचा न्याय होणार नाही, तर त्याने मरणातून पार होऊन जीवनात प्रवेश केला आहे.
येशूंनी उत्तर दिले, "कारण जो कोणी मजवर प्रीती करतो तो माझे शिक्षण आचरणात आणेल. माझे पितादेखील त्यांच्यावर प्रीती करतील आणि आम्ही त्यांच्याकडे येऊ व त्यांच्याबरोबर वस्ती करू.
जे वचन मी तुम्हाला सांगितले आहे त्यामुळे तुम्ही आधी शुद्ध झालाच आहात.
सत्याने त्यांना पवित्र करा; तुमचे वचन सत्य आहे.
पुढे ते मरणातून उठल्यानंतर, त्यांच्या शिष्यांना या शब्दाचे स्मरण झाले. नंतर त्यांनी शास्त्रलेख व येशूंनी उच्चारलेली वचने यावर विश्वास ठेवला.
याकाळात त्यांच्या वचनामुळे आणखी पुष्कळ लोक विश्वासू झाले.
शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे, जे कोणी माझ्यावर विश्वास ठेवतात, त्यांच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील."
Meditar na Palavra
A meditação na Palavra traz prosperidade e bom sucesso. Ela é fonte de sabedoria, consolo e orientação para toda a vida.
शास्त्रग्रंथातील हे नियम नेहमी तुझ्या मुखात असू दे; दिवसा आणि रात्री त्यांचे मनन कर, त्यात लिहिलेल्या सर्व गोष्टींचे काळजीपूर्वक पालन करशील, तर तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील.
जेव्हा तुमचे वचन माझ्याकडे आले मी ते गिळंकृत केले;
ते माझा आनंद आणि माझ्या हृदयाचा उल्लास होते,
याहवेह, सर्वसमर्थ परमेश्वरा,
कारण मी तुमचे नाव धारण केले आहे.
"येशू प्रभू आहे," असे तुम्ही मुखाने जाहीर कराल व परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून उठविले असा तुमच्या अंतःकरणात विश्वास धराल, तर तुमचे तारण होईल. कारण तुमच्या अंतःकरणात विश्वास ठेवल्यानेच तुम्ही नीतिमान ठरता; आणि आपल्या मुखाने इतरांना आपल्या विश्वासाबद्दल सांगितले की तारण होते.
परमेश्वरामध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन.
मी परमेश्वरावर विसंबून आहे आणि मी भिणार नाही.
मर्त्य मानव माझे काय करणार?
परमेश्वराविषयी म्हणाल, तर त्यांचा मार्ग परिपूर्ण आहे.
याहवेहचे वचन दोषरहित आहे;
जे याहवेहच्या ठायी आश्रय घेतात त्यांची ते ढाल आहेत.
माझी ढाल म्हणून तुम्ही मला तारण दिले आहे,
तुमचा उजवा हात मला आधार देतो;
तुमच्या साहाय्याने मला थोर केले आहे.
माझी पावले घसरू नयेत,
म्हणून माझ्या पावलांसाठी तुम्ही मार्ग विस्तृत केला आहे.
तुमच्यापैकी जो जीवनावर प्रीती करतो
आणि अनेक चांगले दिवस पाहण्याची अपेक्षा करतो,
तर तू आपली जीभ वाईटापासून
आणि आपले ओठ असत्य बोलण्यापासून राखावे.
तुमची उपासमार करून तुम्हाला नम्र केले व नंतर तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांनाही पूर्वी कधीही माहिती नसलेला मान्ना खावयास देऊन तुम्हाला शिकविले की, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर याहवेहच्या मुखातून निघणार्या प्रत्येक वचनाने जगेल.
नवीन जन्मलेल्या बालकांसारखे शुद्ध, आध्यात्मिक दुधाची इच्छा धरा म्हणजे तुम्ही तुमच्या तारणाच्या अनुभवामध्ये वाढत जाल.
यास्तव ख्रिस्ताच्या ठायी ऐक्यता असल्यामुळे काही उत्तेजन, त्यांच्या प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, जर काही करुणा व कळवळा आहे, तर तुम्ही एकमेकांशी सहमत होणारे, सारखीच प्रीती करणारे आणि एका आत्म्याचे व एकमनाचे होऊन माझा आनंद परिपूर्ण करा. स्वार्थी महत्त्वाकांक्षा, किंवा बढाई मारण्याच्या हेतूंनी तुम्ही काहीही करू नये, तर प्रत्येकाने नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा अधिक श्रेष्ठ मानावे. तुम्ही केवळ स्वतःचेच हित नव्हे, तर इतरांचेही हित पाहावे.
ख्रिस्त येशूंमध्ये जी मनोवृत्ती होती, तीच वृत्ती तुम्ही एकमेकांच्या संबंधात बाळगा:
ते खुद्द परमेश्वराच्या स्वरुपाचे असूनही
त्यांनी स्वतःस परमेश्वरासमान केले नाही
व परमेश्वरासम असण्याचा लाभ त्यांनी घेतला नाही;
उलट, त्यांनी स्वतःला रिक्त केले
आणि दासाचे स्वरूप घेऊन,
मनुष्यांच्या प्रतिरूपाचे झाले.
मानवी रूप धारण करून
त्यांनी स्वतःस लीन केले,
येथपर्यंत की आज्ञापालन करून ते मरावयास,
आणि तेही क्रूसावरील मरण पत्करण्यास तयार झाले.
म्हणून परमेश्वराने त्यांना अत्युच्च स्थानी ठेवले
आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्यांना दिले;
यासाठी की येशूंच्या नावाने प्रत्येक गुडघा टेकला जावा,
स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली,
परमेश्वर पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीभ कबूल करेल
की येशू ख्रिस्त हेच प्रभू आहेत.
यास्तव, प्रिय मित्रांनो, मी तिथे तुम्हाबरोबर असताना आणि याहीपेक्षा माझ्या अनुपस्थितीत तुम्ही नेहमीच आज्ञापालन केले आहे, म्हणून तुमच्या तारणाचे कार्य भयात व कापत साधून घ्या. कारण परमेश्वर आहेत, की ज्यांनी आपल्या उत्तम योजनेसाठी तुमच्यामध्ये इच्छा करणे व कृती करणे साधले आहे.
जे काही कराल ते सर्व कुरकुर व वादविवाद न करता करा, म्हणजे, "तुम्ही या दुष्ट आणि कुटिल आणि हेकेखोर पिढीत दोषरहित व शुद्ध राहून परमेश्वराची लेकरे" म्हणून त्यांच्यामध्ये आकाशातील तार्यांप्रमाणे चमकाल. तुम्ही जीवनाचे वचन मजबूत धरून ठेवले आहे म्हणून ख्रिस्ताच्या दिवशी माझी धाव व श्रम व्यर्थ झाले नाही याचा मला अभिमान बाळगता येईल. तुमच्या विश्वासाची सेवा आणि यज्ञ यावर मी स्वतः पेयार्पण म्हणून अर्पण केला जात आहे तरी मीही तुमच्याबरोबर आनंद करेन. त्याचप्रमाणे तुम्हीही उल्हासित व्हावे आणि माझ्याबरोबर आनंद करावा.
मला प्रभू येशूंमध्ये आशा आहे की, मी लवकरच तीमथ्याला तुमच्याकडे पाठवेन; म्हणजे तुमची बातमी ऐकून मीही उल्हासित होईन. तुमचा खरा हितचिंतक तीमथ्यासारखा दुसरा कोणी नाही. इतर प्रत्येकजण स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी पाहतात, येशू ख्रिस्ताच्या नाही. शुभवार्तेच्या कार्यात तीमथ्याने मला जसा पुत्र आपल्या पित्यास करतो, तसे साहाय्य करून स्वतःस सिद्ध केले हे तुम्हाला माहीत आहे. माझ्या सर्वगोष्टी व्यवस्थित होताच, त्याला तुमच्याकडे लवकर पाठविता येईल अशी मला आशा आहे; आणि मीही स्वतः लवकर येईन, असा प्रभूवर माझा भरवसा आहे.
मध्यंतरी मला वाटले की मी एपफ्रदीत हा माझा भाऊ, सहकारी, सहसैनिक आणि तुमचा संदेशवाहक याला तुमच्याकडे परत पाठवावे. माझ्या गरजेच्यावेळी मला साहाय्य करण्यासाठी तुम्ही त्याला पाठविले होते. कारण त्याच्या आजाराची वार्ता तुम्ही ऐकली म्हणून तुम्हा सर्वांना भेटावयास तो उत्सुक व चिंताक्रांत झालेला आहे; आणि खरोखरच तो आजारी पडला, अंदाजे मरणोन्मुख झाला होता, पण परमेश्वराने त्याच्यावर आणि माझ्यावरही दया करून मला दुःखावर दुःख होण्यापासून वाचविले. म्हणूनच त्याला तुमच्याकडे परत पाठविण्यास मी अधिकच उत्सुक आहे. कारण त्याला पाहून तुम्हाला आनंद वाटेल आणि माझी चिंताही कमी होईल. प्रभूमध्ये मोठ्या आनंदाने त्याचे स्वागत करून त्याच्यासारख्यांचा सत्कार करा. कारण ख्रिस्ताच्या सेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व त्याला अंदाजे मरण आलेच होते, माझ्यासाठी तुम्हाला ज्यागोष्टी करता आल्या नाहीत त्या त्याने केल्या.
Palavras de vida
As palavras de Deus são espírito e vida. Quem fala deve falar como oráculos de Deus, com verdade, sabedoria e edificação.
निष्काळजीपणाने बोललेला शब्द तलवारीसारखा वेध घेतो,
पण सुज्ञ मनुष्याचे बोलणे आरोग्यदायी असते.
चिंता हृदयावर दबाव आणते,
परंतु कोमल शब्द ते आनंदित करते.
नीतिमान मनुष्याचे मुख जीवनाचा झरा आहे,
परंतु दुष्टाचे मुख हिंसाचाराचे कोठार आहे.
कोमल उत्तराने राग शांत होतो,
परंतु कठोर शब्द क्रोध वाढवितात.
त्यांच्या मुखफळाने मनुष्याचे पोट भरले जाते;
त्यांच्या ओठांनी केलेल्या उत्पन्नामुळे त्यांचे समाधान होते.
जिभेत जीवन आणि मृत्यूचे सामर्थ्य आहे.
आणि जे तिच्यावर प्रेम करतात त्यांना तिचे प्रतिफळ मिळते.
परंतु जे शब्द मुखातून बाहेर येतात ते हृदयातून येतात आणि तेच मनुष्याला अशुद्ध करतात. कारण हृदयातून दुष्ट विचार, खून, जारकर्म, व्यभिचार, चोरी, खोटी साक्ष, निंदा ही बाहेर पडतात;
मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक निरर्थक शब्दाबद्दल जाब द्यावा लागणार आहे. कारण तुमच्या शब्दांवरूनच तुम्ही निर्दोष ठराल, किंवा तुमच्या शब्दांवरूनच तुम्ही दोषी ठराल."
अहो सापांच्या पिलांनो! तुमच्यासारख्या दुष्टांना चांगले आणि यथायोग्य कसे बोलता येईल? कारण अंतःकरणात जे भरलेले आहे तेच मुखातून बाहेर पडते.
आपण सर्वजण अनेक प्रकारे अडखळतो. जर कोणी बोलण्यात कधीही चुकत नाही, तर तो परिपूर्ण आहे व आपले सर्व शरीर ताब्यात ठेवण्यास समर्थ आहे.
घोड्यांनी आज्ञा पाळावी म्हणून आम्ही त्याच्या तोंडात लगाम घालतो व त्याद्वारे संपूर्ण प्राण्याचे शरीर वळवू शकतो. किंवा तारवांचे उदाहरण घ्या, ही तारवे खूप मोठी असतात व प्रबळ वार्यांनी ती लोटली जातात, तरी चालकाची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकाणाने वळविता येतात. त्याचप्रमाणे, जीभ ही शरीराचा लहान अवयव आहे, परंतु ती मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. विचार करा, मोठ्या जंगलाला पेटविण्यासाठी आगीची एक लहान ठिणगी पुरेशी आहे. जीभ सुद्धा आग आहे, आपल्या शरीराच्या अवयवांमध्ये ती दुष्टतेचे जग आहे. ती संपूर्ण शरीराला भ्रष्ट करते, एखाद्याच्या जीवनाला आग लावते आणि स्वतः नरकाच्या अग्नीने पेटलेली आहे.
सर्वप्रकारचे प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी आणि समुद्रातील प्राणी वश झाले आहेत आणि त्यांना मनुष्यप्राण्याने वश केले आहे. परंतु कोणताही मनुष्यप्राणी जिभेला वश करू शकत नाही. ती चंचल दुष्ट, प्राणघातक विषाने पूर्णपणे भरलेली आहे.
तरीपण, संदेश ऐकल्यानेच विश्वास प्राप्त होतो, आणि ख्रिस्ताचा संदेश, वचन ऐकल्यामुळे प्राप्त होतो. परंतु मी विचारतो: त्यांनी ऐकले नाही का? होय, ऐकले:
"पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्यांची वाणी गेली आहे,
कारण जगाच्या शेवटपर्यंत त्यांचा शब्द गेला आहे."