Pular para o conteúdo
Publicidade

1 तीमथ्य 4

1 पवित्र आत्मा स्पष्ट सांगतो की शेवटच्या काळात कित्येक लोक विश्वासापासून दूर जातील आणि धूर्त व दुरात्माच्या शिक्षणावर मन लावतील. 2 ज्या लबाड बोलणार्‍या माणसाची सदसद्विवेकबुद्धी तापलेल्या लोखंडाने डागलेली आहे. 3 हे लोक विवाह करण्यास मनाई करतील, जे अन्न विश्वासणार्‍यांनी आणि सत्य जाणणार्‍यांनी उपकारस्तुती करून स्वीकार करावे म्हणून परमेश्वराने निर्माण केले आहे ते वर्ज्य करावे, असे ते म्हणतील. 4 परमेश्वराने उत्पन्न केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकारस्तुती करून घेतले तर काहीही वर्ज्य नाही. 5 कारण परमेश्वराचे वचन आणि मध्यस्थी प्रार्थना यांनी ती समर्पित होते.

6 जर तू या गोष्टी बंधू भगिनींना समजावून सांगितल्या, तर विश्वासाच्या वचनांनी आणि ज्या चांगल्या शिक्षणाला तू अनुसरले आहेस तसे पोषण होत असलेला ख्रिस्त येशूंचा चांगला सेवक होशील. 7 मूर्ख कल्पना, खुळ्या लोककथा यापासून दूर राहा आणि आपल्या आत्मिक उन्नतीसाठी प्रशिक्षण घे. 8 शारीरिक व्यायाम योग्य आहे, परंतु आध्यात्मिक व्यायाम अधिक महत्त्वाचा आहे, कारण हे सद्य जीवनाचे आणि भावी जीवनाचे अभिवचन देते. 9 ही गोष्ट विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे. 10 याचकरिता आम्ही श्रम व कसून प्रयत्न करतो, म्हणून आमची आशा जो सर्व मानवांचा आणि विशेषतः त्यांच्यावर विश्वास ठेवणार्‍यांचा तारणारा आहे, त्या जिवंत परमेश्वरावर आहे.

11 या गोष्टी आज्ञारूपाने सांग व शिकव. 12 कोणालाही तुझे तरुणपण तुच्छ लेखू देऊ नकोस. तर तू विश्वासणार्‍यांसाठी बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, विश्वासात, शुद्धपणात कित्ता हो. 13 मी तिथे येईपर्यंत सार्वजनिक शास्त्रवाचन करण्यात, बोध करण्यात, शिक्षण देण्यात तत्पर राहा. 14 मंडळीच्या वडिलांनी तुझ्यावर हात ठेवले असता, संदेशाद्वारे जी आध्यात्मिक कृपादाने तुला दिली, त्याची उपेक्षा करू नको.

15 तुझी प्रगती सर्वांच्या लक्षात येईल म्हणून या गोष्टींचे चिंतन कर, यामध्ये तत्पर राहा. 16 तू आपले जीवन आणि शिक्षण यावर नीट लक्ष ठेव. या गोष्टींमध्ये टिकून राहा, कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणार्‍यांचेही तारण करशील.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.