O papel da mulher
A Bíblia honra a mulher como colaboradora essencial no plano de Deus. De Provérbios 31 às mulheres do Novo Testamento, a Escritura celebra a sabedoria, a força e a fé feminina.
A mulher virtuosa
Mulher virtuosa, quem a achará? Seu valor excede o de rubis. Ela é sábia, trabalhadora, generosa e temida pelo Senhor.
सद्गुणी पत्नी कोणाला मिळेल?
तर तिचे मोल माणकाहूनही अधिक आहे.
तिचा पती तिच्यावर पूर्ण भरवसा ठेवतो,
आणि त्याला कोणत्याही मोलवान वस्तूची उणीव पडत नाही.
आयुष्यभर ती त्याच्या हितासाठी झटते,
त्याचे अहित करीत नाही.
ती लोकर व ताग मिळविते
आणि कामात गर्क राहून ते पिंजते.
ती एका व्यापारी जहाजासारखी आहे,
तिची भोजनसामुग्री ती फार लांब जाऊन आणते.
ती रात्र सरताच उठते;
आणि तिच्या कुटुंबीयांच्या भोजनाचा प्रबंध करते
आणि दासींना त्यांचा वाटा पुरविते.
ती शेत घेण्याचा विचार करते, आणि ते विकत घेते;
तिच्या मिळकतीमधून ती द्राक्षमळा लावते.
ती उत्साही व कष्टाळू आहे.
कामे पूर्ण करण्यासाठी तिचे बाहू सशक्त आहेत.
तिचा व्यापार लाभदायक व्हावा यासाठी ती सतर्क असते,
आणि तिचा दिवा रात्रीही मालवत नाही.
ती तिच्या हातांमध्ये चाती धरते,
आणि ती बोटांनी चरकी चालविते.
ती गरिबांना उदारहस्ते देते
आणि गरजूंना सढळ हाताने देते.
ती तागाची वस्त्रे करून विकते
आणि व्यापार्यांना कमरबंद पुरविते.
बल व प्रताप तिची वस्त्रे आहेत.
भविष्याबद्दल विचार करून ती आनंदी होते.
तिचे शब्द सुज्ञपणाचे आहेत.
तिच्या जिभेवर विश्वासूपणाचे शिक्षण असते.
घरातील प्रत्येक गोष्टींवर तिचे बारकाईने लक्ष असते;
आळसाने मिळवलेली भाकर ती कधीही खात नाही.
सुज्ञ स्त्री तिचे घर बांधते,
परंतु मूर्ख स्त्री स्वतःच्याच हातांनी ते जमीनदोस्त करते.
पापी लोकांच्या आमंत्रणाविषयी सावधान
माझ्या मुला, तुझ्या वडिलांचे शिक्षण ऐकून घे
आणि तुझ्या आईची शिकवण विसरू नकोस.
Beleza interior
A beleza verdadeira não é exterior, mas o caráter incorruptível de um espírito manso e tranquilo. Isso tem grande valor diante de Deus.
पत्नींनो याचप्रकारे तुम्ही तुमच्या पतीच्या आज्ञेत राहा, म्हणजे त्यांच्यापैकी कोणी जर परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवीत नाहीत, तर ते वचनाशिवाय त्यांच्या पत्नींच्या वर्तणुकीद्वारे जिंकले जाऊ शकतात; कारण ते तुमच्या जीवनातील शुद्धता आणि आदर पाहतात. जसे की केशरचना आणि सोन्याचे दागदागिने घालणे किंवा आकर्षक वस्त्रे घालणे या बाह्य गोष्टींवर तुमचे सौंदर्य केवळ अवलंबून नसावे, तर याउलट ते तुमच्या अंतःकरणाच्या, न झिजणार्या पण सौंदर्यपूर्ण शांत आणि सौम्य आत्म्याचे असावे, जे परमेश्वराच्या दृष्टीने अति मोलवान आहे. कारण पूर्वीच्या काळातील पवित्र स्त्रिया ज्यांची परमेश्वरावर आशा होती, त्या अशाच प्रकारे स्वतःला सजवित असत. त्यांनी स्वतःला त्यांच्या पतीच्या अधीन केले होते, ज्याप्रमाणे सारा अब्राहामाच्या आज्ञेत राहिली आणि त्याला तिचा प्रभू असे म्हणाली. जर तुम्ही भीती न बाळगता जे चांगले ते करीत आहात, तर तुम्ही तिच्या मुली आहात.
पतींनो, त्याच प्रकारे तुम्ही आपल्या पत्नीबरोबर राहत असताना त्या नाजूक आहेत म्हणून सुज्ञतेने राहा, तुमच्याबरोबर त्यादेखील कृपेच्या जीवनाच्या देणग्यांच्या वतनदार आहेत, म्हणून त्यांना मान द्या म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येणार नाही.
स्त्रियांनीही वागणुकीत शांत, समजूतदार, आदरणीय आणि वस्त्रे प्रावरणांत संयमी असावे. वेशभूषा, सोने किंवा मोती किंवा मोलवान पोशाख यामध्ये नव्हे,
त्याचप्रमाणे, त्यांच्या पत्नीदेखील आदरणीय असाव्यात. त्या निंदानालस्ती करणार्या असू नयेत, तर त्या नेमस्त व सर्व गोष्टींविषयी विश्वासू असाव्यात.
Parceria e dignidade
Deus criou homem e mulher à sua imagem. A mulher não é inferior, mas parceira e co-herdeira da graça da vida.
याप्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाची मानवजात निर्माण केली.
त्यांनी आपल्या प्रतिरूपातच त्यांना निर्माण केले.
पुरुष व स्त्री असे त्यांनी निर्माण केले.
मग परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते त्यांना म्हणाले, "फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका; ती आपल्या सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणार्या प्रत्येक सजीव प्राण्यावर अधिकार गाजवा."
याहवेह परमेश्वर म्हणाले, "मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी एक योग्य मदतनीस निर्माण करेन."
नंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाले,
"तुझ्या प्रसूतिकाळात मी तुझे क्लेश अत्यंत वाढवेन;
वेदनांनी तू तुझ्या संतानास जन्म देशील,
तुझ्या पतीकडे तुझी ओढ राहील,
आणि तो तुजवर सत्ता गाजवील."
प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून स्वतंत्र नाही आणि पुरुषही स्त्रीपासून स्वतंत्र नाही. कारण जशी स्त्री पुरुषापासून, त्याचप्रमाणे सर्व पुरुष स्त्रीपासूनच जन्मले, परंतु सर्वकाही परमेश्वरापासून आहे.
पत्नींनो, जसे प्रभूच्या, तसेच तुम्ही तुमच्या पतीच्या अधीन असा. कारण ज्याप्रमाणे पती हा पत्नीचे मस्तक आहे, तर ख्रिस्त हा त्यांचे शरीर म्हणजे, मंडळीचे मस्तक, तिचा तो उद्धारकर्ता आहे. आता मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन राहते, तसेच पत्नींनी सुद्धा प्रत्येक बाबतीत त्यांच्या पतीच्या अधीन राहवे.
त्याचप्रमाणे वयस्क स्त्रिया आदरयुक्त असाव्या; त्या इतरांच्या चहाड्या करीत फिरणार्या किंवा मद्यपानासक्त नसाव्या; त्या सुशिक्षण देणार्या असाव्या; म्हणजे त्या तरुण स्त्रियांस त्यांच्या पतींवर आणि मुलांवर प्रीती करण्यास, आत्मसंयमी, शुद्धाचरणी, घरकामात मग्न, मायाळू व आपल्या पतींच्या अधीन राहण्यास शिकविता येईल, म्हणजे परमेश्वराच्या वचनाची निंदा होणार नाही.