Perseguição
Jesus advertiu que seus seguidores seriam perseguidos pelo mundo. Mas a perseguição não é sinal de fracasso — é sinal de fidelidade. Bem-aventurados os que sofrem por causa da justiça.
Perseguição como marca do discípulo
Jesus disse: se o mundo vos odeia, sabei que antes de vós odiou a mim. Todo o que quer viver piedosamente será perseguido.
जग शिष्यांचा द्वेष करते
"जर जगाने तुमचा द्वेष केला, तर हे लक्षात ठेवा की त्यांनी प्रथम माझाही द्वेष केला आहे.
खरे पाहिले तर ख्रिस्त येशूंमध्ये जे सुभक्तीने जीवन जगण्याचा निश्चय करतात, त्या सर्वांचा छळ होईल.
धन्य आहेत ते, ज्यांचा नीतिमत्वासाठी छळ करण्यात येतो,
कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
"माझे अनुयायी असल्यामुळे लोक तुमची निंदा, तुमचा अपमान व छळ करतील व तुमच्याविरुद्ध सर्वप्रकारच्या गोष्टी लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य आहात.
मानवपुत्रामुळे जेव्हा लोक तुमचा द्वेष करतात,
तुमच्यावर बहिष्कार टाकतात आणि तुमचा अपमान करतात,
दुष्ट म्हणून तुमचे नाव नाकारतात,
तेव्हा तुम्ही धन्य.
Recompensa na perseguição
Os perseguidos por causa de Cristo receberão grande galardão no céu. Quem perde por amor ao evangelho receberá cem vezes mais.
येशूंनी उत्तर दिले, "मी तुम्हाला निश्चित सांगतो की, ज्यांनी मला अनुसरण्यासाठी व शुभवार्तेसाठी आपले घर, भाऊ, बहीण, आई, पिता, मुले आणि जमिनीचा त्याग केला आहे. या वर्तमान युगात त्याला शंभरपट मोबदला तर मिळेलच, घरे, भाऊ बहीण, आई, मुले आणि जमीन आणि याबरोबरच छळ आणि येणार्या युगात त्याला सार्वकालिक जीवनही मिळाल्याशिवाय राहणार नाही.
मग ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करू शकेल? संकट किंवा आपत्ती किंवा छळ किंवा दुष्काळ किंवा नग्नता, धोका किंवा तरवार काय?
ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान व कष्ट, छळ व अडचणी, याविषयी मी अगदी संतुष्ट आहे; कारण जेव्हा मी अशक्त आहे, तेव्हाच मी सबळ असतो.
Amor e confiança em meio à adversidade
A Bíblia nos ensina a amar nossos perseguidores, abençoar os que nos maldizem e confiar que nossos tempos estão nas mãos de Deus.
पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या शत्रूंवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
जे तुमचा छळ करतात; त्यांना शाप देऊ नका; उलट आशीर्वाद द्या.
माझे दिवस तुमच्याच हातात आहेत.
माझ्या शत्रूंच्या हातातून,
माझा पाठलाग करणार्यांपासून तुम्हीच मला सोडवा.
मृत्युछायेच्या दरीतूनही
मी जात असलो,
तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही,
कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात;
तुमची आकडी व तुमची काठी
मला धीर देतात.
सावध असा, दक्ष राहा! तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्या सिंहासारखा कोणाचा नाश करावा म्हणून शोधीत फिरतो.
मी जमिनीवर पडलो, तेव्हा इब्री भाषेत बोलणारी वाणी मी ऐकली, ‘शौला! शौला! तू माझा छळ का करीत आहेस?’