Reino dos céus
O Reino dos Céus é comparado por Jesus a tesouros, sementes e redes. Através de parábolas, Ele revelou os mistérios de um Reino que já está entre nós, mas que se consumará na eternidade.
O valor incomparável do Reino
O Reino dos Céus é como um tesouro escondido ou uma pérola de grande valor. Quem o encontra, vende tudo para possuí-lo.
मोती, ठेव अनं जाळं यासना दृष्टांत
स्वर्गनं राज्य शेतमा लपाईन ठेयल धनसारखं शे; ते एखादा माणुसले सापडावर त्यानी ते लपाईन ठेवं, अनी आनंद व्हवामुये त्यानी जाईसन आपला सर्व काही ईकी टाकं, अनी मंग ते शेत ईकत लिधं.
चांगला मोतीना दृष्टांत
अजुन स्वर्गनं राज्य चांगला मोतीना शोध करनारा एखादा व्यापारीना सारखं शे; त्याले एक अति मोलवान मोती आढळना तवय जाईसन त्यानी आपलं सर्वा काही ईकी टाकं अनी ते ईकत लिधं.
मोहरीना दाना अनं खमीरनं उदाहरण
येशुनी त्यासले अजुन एक उदाहरण दिसन सांगं, की, स्वर्गनं राज्य मोहरीना दानासारखं शे; ते कोणी एक माणुसनी लिसन आपला वावरमा जाईन लाई दिधं; तो तर सर्वा दानासमा बारीक शे, तरी तो वाढावर पालाभाज्याच पेक्षा मोठा व्हईन त्याना असं झाड व्हस की, आकाशमधला पक्षी ईसन त्याना फांद्यासमा घरटा बांधीसन राहतस.
दृष्टांतना प्रयोग
त्यानी त्यासले अजुन एक दृष्टांत सांगा, की, स्वर्गना राज्य खमीरना सारखं शे; ते एक बाईनी लिसन तीन माप पिठमा लपाईन ठेवं, म्हणीन ते खमीर शेवट सर्व फुगी गयं.
Parábolas do Reino
Jesus ensinou sobre o Reino mediante parábolas que revelam seu crescimento, seu juízo e a separação final entre justos e injustos.
निदाणना दृष्टांत
त्यानी त्यासले दुसरा दृष्टांत दिधा की, स्वर्गनं राज्य त्या माणुसना मायक शे, ज्यानी आपला शेतमा चांगलं बी पेरं. लोके झोपमा व्हतात तवयच त्याना वैरी ईसन गहुमा निदण पेरीसन गया; पण जवय शेतमा पिकले पानटा फुटीन अनं कणीसमा दाणा वनात तवय निदण बी दखायनात. तवय घरमालकना नोकरसनी ईसन त्याले सांगं, महाराज, आपन आपला शेतमा चांगलं बी पैरा ना? मंग त्यामा निदाण कोठेन वनं? तवय मालक त्यासले बोलना, हाई काम कोणी वैरीनं शे. नोकरसनी त्याले सांगं, आम्हीन जाईसन त्यासले गोया करूत अशी तुमनी ईच्छा शे का? तो त्यासले बोलना, नही, तुम्हीन निदाणले गोया करशात त्यानाबरोबर कदाचित गहुले पण उपटी टाकशात कापणीनी येळपावत दोन्हीसले बराबर वाढू द्या, मंग कापणीना येळले मी मजुरसले सांगसू की, पहिले निदाण गोया करा, अनं जाळाकरता त्याना पेंढ्या बांधा; अनी गहु मना कोठारसमा साठाडा.
निदाणना उदाहरणना अर्थ
नंतर येशु लोकसनी गर्दीले निरोप दिसन घरमा गया. अनी त्याना शिष्य त्यानाकडे ईसन बोलनात, वावरमधला निदणना उदाहरणना आमले फोड करीसन सांगा. त्यानी उत्तर दिधं की, चांगलं बी पेरणारा हाऊ मनुष्यना पोऱ्या शे; शेत हाई जग शे; चांगलं बी हाई राज्याना पोऱ्या शेतस; निदण हाई त्या दुष्टना पोऱ्या शेतस; ते पेरणारा वैरी हाऊ सैतान शे; कापणी हाई या काळनी समाप्ती शे; अनी कापणी करनारा या देवदूत शेतस. यामुये जश निदाण गोया करीसन अग्नीमा जाळतस, तसच काळना समाप्तीना येळले व्हई. मनुष्यना पोऱ्या आपला देवदूतसले धाडी, अनी त्या सर्वा अडखळा आणनारासले अनं अधर्म करनारासले त्याना राज्यमाईन गोया करतीन. अनं त्यासले नरक अग्नीना भट्टीमा टाकतीन; तठे त्यासनं रडानं अनं दात खाणं राही. तवय "धार्मीकजण आपला बापना राज्यमा सूर्याना मायक ‘चमकतीन’ ज्याले कान शे तो ऐको."
मासा धरनाराना जाळना दृष्टांत
अजुन स्वर्गनं राज्य समुद्रमा टाकेल जाळानामायक शे; ज्यामा सर्वा प्रकारना जीव एकत्र सापडतस. ते भरावर माणसंसनी काठवर ओढी आणं अनी त्यासनी बशीसन ज्या चांगला त्या भांडामा गोया करात, अनं वाईट त्या फेकी दिधात. तसच हाई युगना समाप्तीमा व्हई; देवदूत ईसन धार्मीकसपाईन दुष्टासले वेगळा करतीन; अनी त्यासले अग्नीना भट्टीमा टाकतीन, तठे रडानं अनं दातखाणं राही.
Quem herda o Reino
Os humildes, os pobres de espírito e as crianças são herdeiros do Reino. Mas é difícil para os ricos entrarem nele.
खरा आनंद
"ज्या मनतीन गरीब त्या धन्य; कारण स्वर्गना राज्य त्यासनं शे!" ज्या शोक करतस त्या धन्य; कारण त्यासले सांत्वन भेटी. ज्या नम्र त्या धन्य, कारण त्या पृथ्वीना वारसदार व्हतीन. ज्या धार्मीकतेना भूक्या-तिशा त्या धन्य, कारण त्या तृप्त व्हतीन. ज्या दयाळु त्या धन्य, कारण त्यासनावर दया व्हई. ज्या मनना शुध्द त्या धन्य कारण त्या देवले दखतीन. ज्या शांती निर्माण करनारा त्या धन्य, कारण त्यासले देवना पोऱ्या म्हणतीन. धार्मीकतामुये ज्यासना छळ व्हयेल शे, त्या धन्य, कारण स्वर्गनं राज्य त्यासनं शे. मनामुये जवय लोक तुमनी निंदा अनं छळ करतीन, अनी तुमना विरूध्द सर्वा प्रकारन्या वाईट लबाडीमा बोलतीन तवय तुम्हीन धन्य. आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गमा तुमनं प्रतिफळ मोठं शे; कारण तुमना पहिले ज्या संदेष्टा व्हई गयात त्यासना त्यासनी तसाच छळ करा.
स्वर्गना राज्यमा मोठा कोण?
त्या येळले शिष्य येशुकडे ईसन बोलणात, स्वर्गना राज्यमा मोठा कोण? तवय त्यानी एक धाकला पोऱ्याले बलाईन त्याले त्यासना मझार उभं करं अनी बोलना; मी तुमले सत्य सांगस, की, तुमनं मन बदलाशिवाय अनं तुम्हीन धाकला पोऱ्यासना मायक व्हवाशिवाय स्वर्गना राज्यमा तुमना प्रवेश व्हवावुच नही. यामुये जो कोणी स्वतःले ह्या धाकला पोऱ्यासना मायक नम्र करी, तोच स्वर्गना राज्यमा मोठा व्हई;
येशु बोलणा, बालकसले मनाकडे येऊ द्या त्यासले मना करू नका, कारण स्वर्गनं राज्य यासना मायकसनंच शे.
तवय येशुनी आपला शिष्यसले सांगं, मी तुमले सत्य सांगस की, स्वर्गना राज्यमा धनवानसना प्रवेश व्हणं कठीण शे. आखो तुमले सांगस, देवना राज्यमा धनवानसना प्रवेश व्हणं यानापेक्षा उंटले सुईना नाकमातीन जाणं सोपं शे. हाई ऐकीन शिष्य भलताच थक्क व्हईसन बोलणात, तर मंग कोणं तारण व्हई? येशुनी त्यासनाकडे दखीन सांगं, हाई मनुष्यले अशक्य शे, "देवले तर सर्व शक्य शे"
मना प्रिय भाऊ अनी बहिणीसवन ऐका! लोकसना नजरमा ज्या गरीब त्या ईश्वासमा श्रीमंत व्हवाकरता अनी जे राज्य देवनी आपलावर प्रिती करनारासले देयल शे त्यानं वारीस व्हवाकरता त्यानी निवडेल शे की नही?
तरी पन परात्पर देवना ज्या पवित्र जन त्यासले राज्य प्राप्त व्हई; ते राज्य सर्वकाळ युगानुयुग, त्यासना ताबामा राही;
Buscar o Reino acima de tudo
Jesus ensinou que devemos buscar primeiro o Reino e sua justiça. Nem todo que diz 'Senhor, Senhor' entrará — só quem faz a vontade do Pai.
मि तुमले वळखस नही
माले प्रभुजी, प्रभुजी म्हणनारा सर्वासना स्वर्गना राज्यमा प्रवेश व्हई अस नही; तर जो मना स्वर्गना पिताना ईच्छाप्रमाणे वागस त्याना प्रवेश व्हई.
यामुये जो कोणी यामधली धाकलीत-धाकली एखादी आज्ञा नष्ट करीसन लोकसले शिकाडी त्याले स्वर्गना राज्यमा सर्वात धाकला म्हणतीन, पण तो जर सर्वा आज्ञा पाळी अनं लोकसले शिकाडी त्याले स्वर्गना राज्यमा सर्वात मोठा म्हणतीन. मी तुमले सांगस, शास्त्री अनं परूशी ह्यासपेक्षा तुमना नम्रपणा अधिक व्हवाशिवाय स्वर्गना राज्यमा तुमना प्रवेश व्हनारच नही.
मंग तुम्हीन अशी प्रार्थना करा; हे आमना स्वर्ग माधला देवबाप, तुनं नाव पवित्र मानोत; तुनं राज्य येवो, जस स्वर्गमा तसं पृथ्वीवर बी तुना ईच्छाप्रमाणे व्हवो.
बाप्तिस्मा करनारा योहानना संदेश
त्या दिनमा बाप्तिस्मा करनारा योहान हाऊ, यहूदीयाना जंगलमा ईसन अशी घोषणा देवाले लागना की, "पापसपाईन फिरा कारण स्वर्गनं राज्य जोडे येल शे!"
तवयपाईन येशु उपदेश करीसन सांगु लागना की, "पापसपाईन फिरा कारण स्वर्गनं राज्य जोडे येल शे!"
अनी जावाना येळले अशी घोषणा करा की, स्वर्गना राज्य जोडे येल शे.
मी तुमले सांगस की, "पुर्व अनं पश्चिमकडतीन" बराच लोके येतीन अनं स्वर्गना राज्यमा अब्राहाम, इसहाक, अनं याकोब, यासना पंगतमा बसतीन;
मी तुमले सत्य सांगस की, बाईपाईन जन्मले माणसंसमा कोणी बाप्तिस्मा करनारा योहानपेक्षा श्रेष्ठ व्हयना नही; तरी स्वर्गना राज्यमा धाकला जो शे तो योहानपेक्षा बी श्रेष्ठ शे. बाप्तिस्मा करनारा योहान ह्याना दिनपाईन आत्तेपावत स्वर्गना राज्यवर हल्ला चाली राहीनात, अनी हल्ला करणारा लोके ते लेवाकरता प्रयत्न करी राहिनात.
A herança eterna
O Reino dos Céus é inabalável e eterno. Deus nos chama a fazer firme a nossa vocação e eleição para entrar nesse Reino.
आपण त्या देवना उपकार मानुत, कारण न हालणारं राज्य आमले भेटेल शे अनी देवले आवडी अशी जी सेवा सुभक्तीघाई अनी भय धरीसन करूत, कारण आपला "देव भस्म करनारा अग्नी बी शे."
यामुये भाऊ अनं बहिणीसवन, तुमले व्हयेल पाचारण अनं तुमनी निवडणुक यानंबद्दल खात्री करीसन लेवाबद्दल विशेष प्रयत्न करा, अस तुम्हीन करं तर तुमना ईश्वास कधीच कमी व्हवाऊ नही. अनी तसा प्रकारे आपला प्रभु तारणारा येशु ख्रिस्त याना सार्वकालिक राज्यमा प्रशस्तपणे तुमना प्रवेश व्हई.
प्रभु माले सर्व दुष्ट योजनामातीन माले सोडाई, अनी आपला स्वर्गना राज्यमा सुखरूप लई ई, त्याले युगानुयुग गौरव असो, आमेन.
स्वर्गीय धन
"हे मना धाकला कळपसवन, भिऊ नका, कारण तुमले राज्य भेटाले पाहिजे हाई तुमना बापले बरं वाटस.
जारकर्म, अशुध्द वर्तन करनारा किंवा लोभी, हाऊ मुर्तिपुजक शे; असासले कोणले बी ख्रिस्तना अनं देवना राज्यमा वारसा नही हाई तुम्हीन जाणतस.