Repouso e férias
Deus criou o descanso como parte da vida. O sábado, o repouso e até as férias refletem a confiança de que Deus sustenta todas as coisas — mesmo quando paramos.
O descanso como ordenança
Deus descansou no sétimo dia e nos convidou a fazer o mesmo. O descanso sabático é um presente de Deus para restauração do corpo e da alma.
तेव्हा परमेश्वराच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे. जो कोणी परमेश्वराच्या विसाव्यात प्रवेश करतो, त्याने जसा परमेश्वराने त्यांच्या कृत्यांपासून विसावा घेतला तसा आपल्या कृत्यांपासून सुद्धा विसावा घेतला आहे.
"जर तुम्ही शब्बाथदिन अशुद्ध करण्यापासून तुमची पावले दूर ठेवाल
आणि माझ्या पवित्र दिवशी आपलीच मनमानी करणे सोडून द्याल,
जर तुम्ही शब्बाथदिनास आनंदाचा दिवस मानाल
आणि तो याहवेहचा पवित्र दिवस आहे म्हणून त्याचा सन्मान कराल,
आणि त्या दिवसाचा आदर करून स्वतःच्या इच्छा बाजूला साराल
आणि मनमानेल असे न वागता व निरर्थक गोष्टींची चर्चा करणार नाही,
तर याहवेहमध्ये तुम्हाला आनंद प्राप्त होईल,
आणि मी तुम्हाला या भूतलाच्या उच्चस्थानी विजयाने चालवेन
आणि तुमचा पिता याकोबाच्या वतनातील उपजावर मेजवानी देईन."
ही याहवेहच्या मुखातील वचने आहेत.
तुम्ही जे खाता किंवा पिता किंवा जे काही करता ते सर्व परमेश्वराच्या गौरवासाठीच करावे.
Sono e paz
Ditar-se em paz e dormir tranquilamente é bênção do Senhor. Quem confia nele dorme sem medo e acorda renovado.
मी शांतचित्ताने झोपी जाईन,
कारण हे याहवेह तुम्हीच
मला सुरक्षित ठेवता.
मी पहुडतो आणि झोप घेतो;
मी पुन्हा उठतो, कारण याहवेह माझे रक्षण करतात.
तुमचे पहाटे उठणे
आणि रात्री उशीरापर्यंत
अन्नप्राप्तीसाठी कष्ट करणे व्यर्थ आहे—
कारण आपल्या प्रियजनांस याहवेहच शांत झोप देतात.
तुला अंधकाराच्या आतंकाचे भय वाटणार नाही,
किंवा दिवसा सुटणार्या बाणांचेही नाही.
तू जेव्हा विसावा घेशील, तेव्हा तुला भीती वाटणार नाही;
जेव्हा तू झोपशील, तुला गोड झोप लागेल.
खाण्यास कमी किंवा भरपूर मिळो
कष्टकर्याला सुखाची झोप लागते.
परंतु श्रीमंताची विपुल संपत्ती
त्यांना रात्री झोप येऊ देत नाही.
Descanso e segurança
No repouso, encontramos segurança. Deus guarda os justos, e mesmo no silêncio da noite, sua paz nos protege e restaura.
आशा प्राप्त झाल्याने तू निर्भय होशील;
तू तुझ्या सभोवती निरखून पाहशील आणि सुरक्षितेत विश्रांती घेशील.
तू निर्भयपणे झोपशील, कोणी तुला घाबरवून टाकणार नाही,
आणि अनेकजण तुझ्या समर्थनाची अपेक्षा करतील.
जे नीतिमार्गाने चालतात
ते शांती पावतात;
त्यांच्या मरणोत्तर त्यांना विसावा प्राप्त होतो.