O Senhor é o meu pastor
O Salmo 23 é a expressão máxima da confiança em Deus como Pastor. Jesus se declarou o Bom Pastor que conhece suas ovelhas, cuida delas e dá a própria vida por elas.
O Senhor é o meu Pastor
Davi declarou com confiança que o Senhor é seu pastor e nada lhe faltará. Ele nos guia, nos restaura e nos conduz em caminhos de justiça.
याहवेह माझे मेंढपाळ आहेत, म्हणून मला काही उणे पडणार नाही.
याहवेह माझे मेंढपाळ आहेत, म्हणून मला काही उणे पडणार नाही.
ते मला हिरव्यागार कुरणात विश्रांती देतात,
ते मला संथपणे वाहणार्या झर्याजवळ नेतात.
ते माझा जीव ताजातवाना करतात.
ते आपल्या नावासाठी
मला नीतिमार्गाने चालवितात.
तुम्ही आपल्या लोकांचे रक्षण करा आणि आपल्या वतनास आशीर्वाद द्या;
त्यांचे मेंढपाळ होऊन त्यांना सदासर्वकाळ उचलून धरा.
O Bom Pastor
Jesus é o Bom Pastor que conhece suas ovelhas pelo nome. Ele dá a vida por elas, as protege e nenhuma pode ser arrebatada de sua mão.
"मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरिता आपला जीव देतो.
"मी उत्तम मेंढपाळ आहे; मला माझी मेंढरे माहीत आहेत व माझ्या मेंढरांना मी माहीत आहे तसेच माझे पिता मला ओळखतात आणि मी पित्याला ओळखतो आणि मी माझ्या मेंढरांसाठी माझा जीव देतो. माझी आणखी काही मेंढरे आहेत, पण ती या मेंढवाड्यातील नाहीत. त्यांनासुद्धा मी माझ्या मेंढवाड्यात आणलेच पाहिजे. ते सुद्धा माझी वाणी ऐकतील आणि मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल.
जो दाराने आत जातो तो मेंढरांचा मेंढपाळ आहे. दारावरचा पहारेकरी त्याच्यासाठी दार उघडतो आणि मेंढरे त्यांची वाणी ओळखतात. तो आपल्या मेंढरांना त्यांच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर घेऊन जातो. आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर, तो त्यांच्यापुढे चालतो व मेंढरे त्याला अनुसरतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात.
कारण "मेंढरांप्रमाणे तुम्ही परमेश्वरापासून बहकून दूर गेला होता," परंतु आता तुम्ही तुमच्या मेंढपाळाकडे आणि तुमच्या आत्म्याच्या रक्षकाकडे परत आला आहात.
जेव्हा मुख्य मेंढपाळ येतील, तेव्हा गौरवाचा मुकुट तुम्हाला मिळेल, तो कधीच झिजणार नाही.
O cuidado pastoral de Deus
Como pastor terno e forte, Deus carrega os cordeiros nos braços e guia com cuidado as ovelhas que amamentam.
पाहा, सार्वभौम याहवेह सामर्थ्याने येत आहेत,
आणि ते बलाढ्य हाताने राज्य करतात.
पाहा, त्यांचे बक्षीस त्यांच्याबरोबर आहे,
आणि ते देत असलेला मोबदला त्यांच्याबरोबर आहे.
ते मेंढपाळाप्रमाणे त्यांच्या कळपाचे संगोपन करतात:
ते कोकरांना त्यांच्या कवेत एकत्र करतात
आणि आपल्या हृदयाजवळ ठेवतात;
जे अजून पिल्ले आहेत, त्यांना ते सौम्यपणाने नेतात.