Vitória
A vitória do cristão não depende de suas próprias forças, mas do poder de Deus que opera em nós. As Escrituras declaram que somos mais que vencedores por meio daquele que nos amou.
A vitória vem de Deus
O Senhor luta por nós. Quando confiamos nele, nenhuma arma forjada contra nós prosperará e nenhum inimigo prevalecerá.
कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाबरोबर जात आहेत. ते तुमच्यासाठी तुमच्या शत्रूविरुद्ध लढतील आणि तुम्हाला विजय प्राप्त करून देतील."
तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, "त्यांना भिऊ नकोस; मी त्यांना तुझ्या हाती दिलेले आहे. त्यांच्यातील कोणीही तुझ्यापुढे टिकाव धरू शकणार नाही."
लढाईसाठी घोड्याला तयार केले आहे,
परंतु विजय देणे याहवेहच्याच हाती असते.
त्यांच्या तलवारीने त्यांनी हा देश जिंकला नाही,
आणि त्यांच्या बाहुबलाने त्यांना विजयी केले असेही नाही;
हे तुमच्या उजव्या हाताने, तुमच्या भुजांनी
आणि तुमच्या मुखप्रकाशाने हे केले, कारण तुम्ही त्यांच्यावर प्रीती केली.
तुम्ही माझे राजा आणि परमेश्वर आहात,
जे याकोबाच्या विजयाचा आदेश देतात.
Mais que vencedores
Em todas as circunstâncias, a fé nos dá a vitória. O mundo tenta nos derrubar, mas Cristo já venceu o mundo e nos faz triunfar.
कारण प्रत्येकजण जे परमेश्वरापासून जन्मले आहेत त्यांनी या जगावर मात केली आहे. आमच्या विश्वासाच्याद्वारे आम्ही या जगावर मात करून विजय मिळविला आहे.
नाही, या सर्व गोष्टीत ज्यांनी आमच्यावर प्रीती केली, त्यांच्याद्वारे आम्ही अत्यंत विजयी आहोत. कारण माझी खात्री आहे की ना मरण ना जीवन, ना देवदूत ना भुते, ना वर्तमान ना भविष्यकाळ, ना कोणती शक्ती, अथवा उंची, खोली आणि सृष्टीमधील कोणतीही गोष्ट आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामधील परमेश्वराच्या प्रीतीपासून आपणास विभक्त करू शकणार नाही.
अशा गोष्टींना प्रतिसाद म्हणून काय म्हणावे? जर परमेश्वर आपल्या पक्षाचे आहेत तर आमच्याविरुद्ध कोण असू शकेल?
"अरे मरणा, तुझा विजय कुठे?
अरे मरणा, तुझी नांगी कुठे?"
कारण मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. परंतु आपण परमेश्वराचे आभार मानू, कारण तेच आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे विजय देतात.
Força para a batalha
Deus nos reveste com sua armadura espiritual, nos fortalece e nos encoraja. Mesmo que o justo caia sete vezes, ele se levanta.
यास्तव वाईट दिवसांमध्ये तुम्हाला खंबीरपणे उभे राहता यावे आणि सर्वकाही केल्यानंतर टिकाव धरता यावा म्हणून परमेश्वराची शस्त्रसामुग्री धारण करा.
कारण नीतिमान जरी सात वेळा पडतात, तरी ते पुन्हा सावरतात,
परंतु जेव्हा दुष्ट लोकांवर अरिष्ट कोसळते, ते नाश पावतात.
परमेश्वराच्या साहाय्याने आमचा विजय सुनिश्चित आहे,
आणि तेच आमच्या शत्रूंना पायदळी तुडवतील.
हजार लोक तुझ्याजवळ पडले,
आणि दहा हजार तुझ्या उजव्या बाजूला पडले,
तरी ती संकटे तुझ्या जवळदेखील येणार नाहीत.
जे मला शक्ती देतात त्यांच्याद्वारे सर्वकाही करण्यास मी समर्थ आहे.