देव प्रकाश शे
5 जो संदेश आम्हीन त्याना पोऱ्याकडतीन ऐकेल शे तो तुमले ऐकाडतस; तो संदेश हाऊ शे की, देव प्रकाश शे अनी त्यानामा कसानाच अंधार नही शे.
6 जर आपण अस म्हणतस की, त्यानासंगे आमनी सहभागीता शे; पण अंधारमाच चालत राहिनुत, तर आपण खोटं बोली राहिनुत, सत्यतीन वागी नही राहीनुत; 7 जसं तो प्रकाशमा शे तसा जर आपण प्रकाशमा चालत राहिनुत तर आपली एकमेकससंगे सहभागिता शे, अनी त्याना पोऱ्या येशु यानं रक्त आपले सर्व पापसपाईन शुध्द करस.