वडील लोके अनी तरूणसले संदेश
1 तुमनामाधला वडील लोके शेतस, मी त्यासनामायक वडील अनी ख्रिस्तना दुःखसना साक्षीदार अनी प्रकट व्हनारं गौरवमा सहभागी व्हईसन त्यासले हाई समजाडी राहीनु; 2 ५:२ योहान २१:१५-१७तुमनामाधला देवना कळपनं पालन करा; करनं पडस म्हणीन नही, तर देवना ईच्छाप्रमाणे आनंदतीन त्यानी देखरेख कर; द्रव्यलोभतीन नही तर उत्सुकतातीन करा; 3 ज्या लोके तुमले सोपेल शेतस, त्यासनावर अधिकार चालाडू नका, पण तुमना गटकरता आदर्श बना.