20 देवना वचनं कितला बी राहोत, त्यानामा "हा" हाईच शे; यामुये देवनं गौरव व्हवाले पाहिजे म्हणीसन त्यानाकडतीन "आमेन" हाई बी शे. 21 जो आमना अभिषेक करीसन तुमले ख्रिस्तमा पक्क करस; तो देव शे. 22 आम्ही त्याना शेतस अनी आमनावर त्याना शिक्का शे, त्यानी त्याना पवित्र आत्मा आमले देयल शे.