पौल देवना उपकार मानस
3 आपला परमेश्वर अनी प्रभु येशु ख्रिस्तना बाप जो देव, दया करनारा देवबाप अनी सर्वासले सांत्वना देणारा देव, तो धन्यवादित असो.
4 तो आमनावरला सर्व संकटमा आमले दिलासा देस, त्या मदतमुयेच आमले स्वतः देवकडतीन दिलासा मिळस, त्या मदतमुये ज्या कोणी, कोणता बी संकटमा शेतस त्यासले मदत कराले आम्हीन समर्थ व्हवाले पाहिजे,