कोकरा अनी त्याना लोकं
1 १४:१ प्रकटीकरण ७:३ नंतर मी दखं, कोकरा सियोन डोंगरवर उभा व्हता; त्यानासंगे त्यानं नाव अनं त्याना पितानं नाव कपाळवर लिखेल असा एक लाख चौरेचाळीस हजार लोक व्हतात, 2 अनी बराच जलप्रवाहना शब्दसनामायक अनं मोठा गर्जनना शब्दनामायक स्वर्गमातीन येल आवाज मी ऐका; अनी जो आवाज मी ऐका तो, जस काय वीणा वाजडणारा आपली वीणा वाजाडी राहिना, असा होता. 3 एक लाख चौरेचाळीस हजार लोक राजासनसमोर अनी चार प्राणी अनं वडील लोक यासना समोर उभा व्हतात. ते एक नविन गाणं म्हणी राहिंतात; ते गाणं, त्यासनाशिवाय कोणलेच शिकता ई नही राहिंत. 4 बाईनासंगे संबंध नही ठेयल अनं स्वतःले शुध्द ठेयल ह्याच त्या लोकं शेतस. जठे कोठे कोकरा जास तठे त्यासनामांगे जाणार त्या ह्या शेतस. त्यासले माणुस मातीन ईकत लिसन देवले अनं कोकराले पहिलं फळ म्हणीन अर्पण करेल शे. 5 त्यासना तोंडमा लबाडी सापडस नही; त्या निष्कलंक शेतस.