1 यानानंतर स्वर्ग माधला लोकसनी मोठी गर्दीना जशा काय एक मोठा आवाज मी ऐका; तो बोलना, "देवनी स्तुती असो! तारण, गौरव अनं सामर्थ्य ह्या आमना देवना शेतस! 2 कारण त्याना न्याय सत्यना अनं नीतिना शेतस, ज्या वेश्यानी आपला जारकर्मतीन पृथ्वी भ्रष्ट करी तिना न्यायनिवाडा त्यानी करेल शे अनी आपला दाससना रंगतबद्दल तिले शिक्षा करेल शे." 3 त्या दुसऱ्यांदाव बोलणात, "देवनी स्तुती असो! तिना धूर युगानुयुग वर चढी राहिना!"
Publicidade