शिक्का
1 मंग कोकरानी त्या सात शिक्कासपैकी एक शिक्का फोडा ते मी दखं, तवय चार प्राणीसपैकी एक मेघगर्जनासनामायक आवाजतीन, "ये!" असं बोलणा, ते मी ऐकं, 2 मंग मी दखं तो पांढरा घोडा, अनी त्यानावर बशेल स्वार माले दिसना; त्यानाजोडे धनुष्य व्हता, मंग त्याले मुकुट देवामा वना; तो विजेतानामायक विजयवर विजय मिळावत निंघना.