अंतना समय
1 12:1 प्रकटीकरण 12:7; 7:14; मत्तय 24:21; मार्क 13:19 त्या येळले तुना लोकसना रक्षण करनारा मोठा अधिपती जो मीखाएल दूत शे तो उठी; कोणतंबी राष्ट्र व्हवापाईन कवयच वनं नही अश संकट त्या येळले ई; तुना लोकसपाईन ज्यासनं नावे वहीमा लिखेल दखाई त्या सर्वा त्या येळले मुक्त व्हतीन. 2 12:2 यशया 26:19; मत्तय 25:46; योहान 5:29 जमीनमाधला मातीमा झोपेलसना मोठा समुदाय उठी; कितलाजन सर्वकाळना जीवन भेटाकरता अनी कितलाजन अप्रतिष्ठा अनं सर्वकाळना धिक्कार भेटाकरता उठतीन. 3 ज्या सुज्ञ राहतीन त्या अंतराळना प्रकाशनामायक चमकतीन; बराच लोकसले धार्मिकताकडे आणनारा लोक युगानुयुग तारानामायक चमकतीन.