11 तवय मोशे आपला देव यहोवा यानी किवा कराले लागना, हे परमेश्वरा, तु आपला माणसासले महासामर्थ्यातीन अनी भुजबळतीन मिसर देशमाईन सोडाई आनेल शे त्यासनावर तुना कोप काबर भडकाले पाहिजे? 12 त्यासले पहाडमां मारी टाकानं अनी पृथ्वीवरतीन त्यासले नष्ट करानं मनीसनं त्यासले मिसर देशमाईन परमेश्वरनी बाहेर काढं आशे मिसरी लोकेसनी बोलानं का? आपला कोपपाईन दुर व्हय, आपला लोकेसवर अरिष्ट आणानं तू ठरायेल शे त्यापाईन दुर व्हय. 13 32:13 उत्पती 22:16-17; 17:8तुन दास अब्राहाम, इसहाक अनी इस्त्राएल यासनी आठवन करं; तु त्यासले सोतानी शपथ लिसनं सांग व्हतं की तुमनी संतती आकाशमाधली तारासनीसारखी बहुगुनित करसू, अनी हया देशनीबारामां मी तुमले सांगं तो बठा तुमनी संततीले दिसू अनी ती त्यासनी कायमनी वतनदार व्हई. 14 तवय मी मना लोकेसनी अनिष्ट करसू आशे जे परमेश्वरनी सांगं व्हतं त्यापाईन तो दुर व्हयना.