3 तवय अब्राम उपडा पडना, अनी देव त्यानासंगे बोलना, तो बोलना, 4 दख मी तुनासंगे मना हाऊ करार करस तू राष्ट्रसमूहना जनक व्हसी. 5 17:5 रोम 4:17यापुढे तुले अब्राम अश म्हनावुत नहीत, तर तुले अब्राहाम अश म्हणतीन, कारण मी तुले राष्ट्रसमूहना जनक बनाडेल शे. 6 मी तुले भलतं फलसंपन्न करसु; तुनापाईन मी राष्ट्र बनाडसु; तुनापाईन राजा उत्पन्न व्हतीन.
7 17:7 लूक 1:55 मी तुना अनं तुनामांगे तुना संतानना देव व्हसु, अश कायमना करार मी तुनासंगे अनी तसच तुना पश्चात तुना संताननासंगे पिढानपिढा करस. 8 17:8 प्रेषित 7:5हाऊ जो कनान देशमा तु उपरी शे, तो सर्वा देश मी तुले अनं तुना पश्चात तुनी संतानले कायमना वतन म्हणीसन दिसु अनी मी त्यासना देव व्हसु.
9 देव अब्राहामले आखो बोलना, आते तू अनी तुना पश्चात तुनी संततीने पिढानपिढा कायम मना करार पाळानं. 10 17:10 रोम 4:12; प्रेषित 7:8मनासंगे अनी तू अनं तुना पश्चात तुनी संतती यासनामा स्थापेल मना करार जो तुम्हीन पाळाशात तो हाऊ; तुमनामातील प्रत्येक माणुसनी सुंता व्हवाले पाहिजे. 11 तुमनी अग्रत्वचा काढामा येवाले पाहिजे; हाई मनामा अनं तुमनामा व्हयेल करारनी खूण राही.