10 18:10 रोम 9:9 मंग तो बोलना, पुढला वसंतरऋतुमा मी तुनाकडे परत ईसु; तवय दख, तुनी बायको सारा हिले पोऱ्या व्हई,
त्यानामांगे तंबूमा सारा हाई ऐकी राहिंती. 11 अब्राहाम अनं सारा ह्या म्हातारा व्हई जायेल व्हतात अनी साराले मासिक पाळी येवानं बंद व्हई जायेल व्हतं. 12 18:12 १ पेत्र 3:6तवय सारा मनमाच हसत बोलनी; मी पुरी म्हतारी व्हई जायेल शे अनं मना धनी बी म्हतारा व्हई जायेल शे, तर हाई सुख आते माले भेटी का?