गरार अनी बैरशेबा आठे इसहाक
1 अब्राहामना येळले जस दुष्काळ पडेल व्हता तस दुसरा दुष्काळ आते देशमा पडना, तवय इसहाक हाऊ पलिष्टसना राजा अबीमलेख यानाकडे गरार नगरमा गया. 2 तवय परमेश्वरनी त्याले दर्शन दिसन सांगं, मिसर देशमा जाऊ नको; मी सांगस त्या देशमा ऱ्हाय. 3 26:3 उत्पती 22:16-18तू हाईच देशमा ऱ्हाय, मी तुनासंगे ऱ्हासु, अनी तुले आशिर्वादित करसु; कारण हाऊ सर्वा देश मी तुले अनं तुना संतानले दिसु; अनी मी तुना बाप अब्राहाम यानासंगे खायेल शपथ करी करसु. 4 मी आकाशमाधली तारासना इतली तुनी संतान वाढावसु, हाई सर्व तुना संतानले दिसु, अनी पृथ्वीवरना सर्व राष्ट्र तुना संतानमुये आशिर्वादित व्हतीन. 5 कारण अब्राहामनी मना शब्दले मान दिधा, मना सांगानं ऐकं, मना आज्ञा, मना नियम अनं कायदा पाळात.
6 तवय इसहाक गरार नगरमां वस्ती करीसनं राहिना. 7 26:7 उत्पती 12:13तठला लोकसनी त्यानी बायकोबद्दल ईचारं तवय तो बोलना, हाई मनी बहिण शे; त्यानी हाई इचार करीसन अश सांगं, कारण त्याले भिती वाटनी की, जर मी तिले मनी बायको म्हणसु, तर या लोके रिबकामुये माले मारी टाकतीन कारण ती देखणी शे. 8 तो तठे बराच काळ राहावावर एक दिनले पलिष्टसना राजा अबीमलेख यानी खिडकीमाईन दखं की, इसहाक आपली बायको रिबकानासंगे प्रेमगोष्टी करतांना त्याले दिसनात.