41 याकोबले आपला बापनी आशिर्वाद दिधा त्यामुये एसावनी त्यानासंगे वैर धरं; एसावनी आपला मनमा सांगं, मना बापनं मरणनं दिन जोडे येल शे, त्यानानंतर मी आपला भाऊ याकोबले मारी टाकसु. 42 आपला मोठा पोऱ्या एसाव यानं म्हणनं रिबकाले सांगाम वनं, तवय तिनी आपला धाकला पोऱ्या याकोब याले बलाईसन सांगं, दख, तुले मारी टाकना बेत करीसन तुना भाऊ एसाव आपला समाधान करी ली राहिना शे. 43 तर मना बाळा, आते मना ऐक: ऊठ, हारान आठे मना भाऊ लाबान शे, त्यानाकडे पळी जाय, 44 अनी तुना भाऊना तुनावरना राग जास तोपावत थोडा दिन त्यानाजोडे राय.
योकोब लाबानकडे जासं
45 तुना भाऊना तुनावरना राग जाईसन तू त्यानासंगे जे करं त्याना त्याले विसर पडस नही तोपावत तू तठेच राय; मंग मी तुले तठेन बलाई लयसु; एकच दिनले तुम्हीन दोन्ही बी मनापाईन काबंर दूर व्हवाले पाहिजेत.