12 तु जमीननी मशागत करशी तवय ती यानापुढे तुले आपला सत्व देवाव नही; तु पृथ्वीवर बेघर अनं भटक्या व्हशी."
13 तवय काईन परमेश्वरले बोलना, "हाई मनी शिक्षा माले सहन करता येवाव नही इतली भारी शे. 14 दखा, हाई जमीनवरीन माले आज तु हाकली देल शे; मी तुना नजरतीन लपेल ऱ्हासु, मी पृथ्वीवर बेघर अनी भटक्या व्हसु; अनी ज्या कोणले बी मी सापडसु तो माले मारी टाकी अश व्हई."
15 परमेश्वर त्याले बोलना, "तर मंग जो कोणी काईनले ठार मारी त्याना सातपट सूड लेवामा ई अनी काईन कोणले सापडना तर त्याले कोणी मारानं नही म्हणीसन त्याले परमेश्वरनी खूण नेमी दिधी."
16 काईन परमेश्वरपाईन निंघना अनी एदेनना पुर्वले नोद 4:16 नोद बेघरवालानावना देशमा वस्ती करीन राहिना.