5 तुम्हीन माले हाई देशमा ईकी टाकं यानाबद्दल आते काही दु:ख करानं नही; अनी संताप करी लेवानं नही, कारण तुमना जीव वाचाडवा म्हणीन देवनी माले तुमनापुढं धाडेल शे. 6 हाऊ देशमा अजून दोन वरीस दुष्काळ पडाव शे; अनी आखो पाच वरीस अशच येवाव शेतस की, त्यामा नांगराणी अनं कापणी काहीच व्हवाव नही. 7 देवनी माले तुमनापुढे यानाकरता धाडं की, पृथ्वीवर तुमना वंशजना सांभाळ व्हवाले पहिजे, अनी मोठी सुटका करीसन तुमना जिव वाचाडाले पाहिजे. 8 म्हणीन आते माले आठे धाडनारा तुम्हीन नहीत तर देव शे, अनी माले त्यानी फारोना बापना समान करीन त्याना सर्वा घरदारना मालक अनी सर्वा मिसर देशना शासक बनाडी ठेयेल शे.