मानवनी दुष्टाई
1 नंतर पृथ्वीवर मानवनी वाढ व्हवाले लागनी अनी त्यासले पोऱ्या अनं पोरी व्हयनात. 2 तवय मानव पोरी देखन्या शेतस अश देवपुत्रसनी दखं, अनं त्यासमाईन त्यासले ज्या पटन्यात त्या त्यासनी बायका कऱ्यात. 3 तवय परमेश्वर देव बोलना, मनुष्य भ्रांत व्हवामुये मना आत्मानी त्यानाठायी सर्वकाळ सत्ता रावावु नही; तो शरीरधारी शे, पण त्याले मी एकशेवीस वरीसना काळ दिसु. 4 त्या काळले पृथ्वीवर महाकाय व्हतात, पुढे देवपुत्र मानव पोरीसना जोडे गयात तवय त्यासले पोऱ्या व्हयनात, त्या प्राचीन काळना वीर अनं नावाजेल पुरूष व्हई गयात.
5 6:5 मत्तय 24:36 पृथ्वीवर मानवनी दुष्टाई खुप शे, त्यासन्या मनमाधल्या येनाऱ्या सगळ्या कल्पना मात्र एकसारख्या वाईट शेतस अश परमेश्वर देवनी दखं. 6 म्हणीन मानवले पृथ्वीवर बनाडाबद्दल परमेश्वरले अनुताप व्हयना, अनी त्याना चित्तले खेद व्हयना. 7 तवय परमेश्वर बोलना, "मी बनाडेल मानवले पृथ्वीवरीन नष्ट करसु; मानव, पशु, रांगनारा प्राणी, आकाशमाधला पक्षी ह्या सगया नष्ट करसु, कारण त्यासले बनाडाना माले अनुताप व्हई राहिना शे." 8 पण नोहावर परमेश्वर देवनी कृपादृष्टी व्हती.
नोहा तारू बनाडस
9 नोहानी वंशावळी याप्रकारे नोहा हाऊ आपला काळना लोकसमा नितीमान अनं सात्विक मनुष्य व्हता; नोहा देवनासोबत चाले.