6 याले चाळीस दिन लोटावर नोहानी तारूले जी खिडकी करेल व्हती ती त्यानी उघाडी. 7 अनी त्यानी एक कावळा बाहेर सोडं; तो पृथ्वीवरना पाणी सुकास तोपावत इकडे तिकडे फिरत राहिना. 8 मंग त्यानी जमिन वरनं पाणी आटनं की नही हाई दखाकरता त्यानी एक कबुतर बाहेर सोडं; 9 त्या कबुतरले पाय टेकाले कोठेच आधार भेटना नही म्हणीन ते त्यानाकडे तारूनाजोडे परत वनं; कारण सर्वीच पृथ्वीना पाठवर अजुन बी पाणी व्हतं; तवय नोहानी आपला हात बाहेर काढीसन त्याले धरीसन आपलाजोडे तारूमा लिधं. 10 त्यानी अजुन सात दिन वाट दखीसन त्या कबुतरले तारूमाईन परत बाहेर सोडा; 11 संध्याकाळले ते कबुतर त्यानाकडे परत वनं, ते त्याना चोचमा जैतुन झाडना नुकताच फुटेल पान शे अश त्याले दखायनं, नोहाले त्यावरीन समजनं की, पृथ्वीवरलं पाणी आते आटी जायेल शे. 12 त्यानी अजुन सात दिन थांबीसन त्या कबुतरले परत सोडं; तवय ते त्यानाकडे परत फिरीन वनं नही.