8 देव नोहाले अनं त्यानासोबत त्याना पोऱ्यासले बोलना, 9 "मी तुमनासंगे अनं तुमनानंतर तुमना संतानना संगे करार करी ठेवस. 10 त्यानाप्रमाणे तुमनासोबत ज्या सजीव प्राणी शेतस, म्हणजे तुमनासोबत तारूमाईन बाहेर येल पक्षी, ग्रामपशु अनं पृथ्वीवरना बाकी सर्वा प्राणी यासनासंगे बी मी करार करी ठेवस. 11 तुमनासंगे हाऊ करार करी ठेवस की, परत जलप्रलमा जीव नाश व्हवावुत नही, अनी पृथ्वीना नाश करनारा जलप्रलय परत कधीच व्हवावु नही. 12 देव बोलना, मनामा अनी तुमनामा त्यानाप्रमाणे तुमनासंगे राहेल सर्वा सजीव प्राणीसमा पिढ्यानपिढा, युगानुयुग राहनारा जो करार मी करी ऱ्हायनु शे त्यानं हाई चिन्ह शे. 13 मी ढगमा धनुष्य ठेयल शे, तो पृथ्वीना अनं मनासोबत व्हयेल करारना चिन्ह राही.