23 या, आपण आशा धरी ठेयल शे तिले भक्कम धरी ठेवुत, कारण ज्यानी वचन देयल शे तो देव ईश्वासयोग्य शे. 24 प्रिती अनी चांगला कामे कराकरता उत्तेजन भेटी अस एकमेकसकडे ध्यान द्या. 25 आपण काही लोकसना चालीरितीसना मायक आपलं एकत्र राहनं सोडू नका, तर एकमेकसले प्रोत्साहन देवानं अनी देव येणार शे तो दिन जोडे ई राहीना हाई तुम्हीन दखतस, म्हणीसन विशेषकरीन हाई करा.