7 बापना शिस्तकरता तुम्हीन सहन करी राहिनात, देव पोऱ्यासंगे तसा तुमनासंगे वागस, ज्याले बाप शिक्षा करस नही असा कोण पोऱ्या शे? 8 जर तुमले इतर पुत्रसनामायक शिक्षा व्हयनी नही तर त्याना अर्थ असा की तुम्हीन त्याना खरा पोऱ्या नहीत तर तुम्हीन दासीपुत्र मायक शेतस.