24 "मी तुमले खरंखरं सांगस; जो मनं वचन ऐकस अनी ज्यानी माले धाडेल शे त्यानावर ईश्वास ठेवस त्याले सार्वकालिक जिवन प्राप्त व्हई जायेल शे; अनी त्यानावर न्यायनी येळ येवाव नही, तो मरणमातीन जिननमा पार जायेल शे. 25 मी तुमले खरंखरं सांगस; अशी येळ ई राहीनी, ती ई जायेल शे, त्यामा मरेल लोके देवना पोऱ्यानी वाणी ऐकतीन, अनी ज्या ऐकतीन त्या जिवत होतीन.